IND vs NZ Test Series: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठा बदल, कुलदीप यादव बाहेर आणि...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका 19 नोव्हेंबरपासून होणार आहे. असं असताना बीसीसीआयने भारतीय संघात एक बदल केला आहे.
November 14, 2026 02:27 PM
IND vs NZ Test Series: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठा बदल, कुलदीप यादव बाहेर आणि... (Photo: ANI)
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 नोव्हेंबरपासून होणार असून टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कारण ही कसोटी मालिका भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहे. असं असताना या मालिकेसाठी भारतीय संघाने रणनिती आखली आहे. इतकंच काय तर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यात शुभमन गिल खेळत नाही. दुसरीकडे, पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून ही माहिती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. तर कुलदीप यादवला संघातून रिलीज केलं आहे.
शेवटच्या वनडे सामन्यात गुरनूर ब्रार खेळणार नाही
गुरनूर ब्रारने तीन वनडे सामन्यात 15.89 च्या सरासरीने 9 विकेट काढल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी गुरनूर ब्रार आता शेवटच्या वनडे सामन्यात खेळणार नाही. यापूर्वी कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज यांच्याबाबत असाच निर्णय घेतला होता. न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन बीसीसीआयने गुरनूर ब्रारला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, कुलदीप यादव कसोटी संघातून रिलीज केलं आहे. कुलदीप यादव आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकतो.
[caption id="attachment_1075114" align="aligncenter" width="800"] सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमारचा फॉर्म काही चांगला नव्हता. अंतिम फेरीतही ...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित काय?
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 साखळीत भारताचे सात सामने शिल्लक आहेत. त्यापैकी दोन सामने न्यूझीलंड आणि पाच सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारताला या स्पर्धेत कायम राहायचं असल्यास न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं अंतिम फेरी गाठणं कठीण होईल.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अद्ययावत भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार.