Sanjay Shirsat : इम्तियाज जलील यांच्यावर घणाघाती टीका ते विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राऊतांना टोमणा; मंत्री संजय शिरसाट यांची चौफेर टोलेबाजी

या पत्रकार परिषदेत त्यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या आरोपांना अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही उपरोधिक टोलेबाजी केली. यासोबतच शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर : आज छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी विविध राजकीय घडामोडींवर आणि स्थानिक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या आरोपांना अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही उपरोधिक टोलेबाजी केली. यासोबतच शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.



एका दलालाने एवढे बोलू नये... 


घरावरील हल्ल्यानंतर होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला. जलील यांची तुलना विजेच्या दिव्याशी करत "त्यांची लायकी काय ? दलाली करणे हा आमचा धंदा नाही," असा घणाघात त्यांनी केला. आपण बकवास करणाऱ्या लोकांची वक्तव्ये मनावर घेत नसल्याचे सांगत, अधिकाऱ्यांकडून खुशाल माहिती घ्यावी; जर एकानेही माझ्यावर पैशांच्या व्यवहाराचा आरोप सिद्ध केला, तर मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हानही शिरसाट यांनी दिले. तसेच, निदा खान प्रकरणाची आठवण करून देत, "निदा खान प्रकरणाचे काय झाले ते पाहा, आता तुझ्यावरच जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे, त्यामुळे एका दलालाने एवढे बोलू नये," असा इशाराही त्यांनी जलील यांना दिला. दरम्यान, शहरात सध्या चर्चेत असलेल्या मफलरच्या फोटो आणि पोस्टर वादावर बोलताना त्यांनी आपले हात झटकले. ते पोस्टर कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावले याची आपल्याला कोणतीही माहिती नसून, ज्यांनी ते लावले त्यांनीच उत्तर द्यावे, या सर्व घडामोडींचा सोक्षमोक्ष लवकरच लागेल, असे ते म्हणाले.






विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टिप्पणी करताना शिरसाट यांनी उपरोधिक भाष्य केले. "अंबादास दानवे हे खूप विद्वान असून त्यांच्याकडे जगातील माहितीचा भांडार आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही माहिती हवी असेल, तर ती त्यांच्याकडेच मिळेल. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने त्यांना प्रत्युत्तर देणे योग्य नाही," असा चिमटा त्यांनी काढला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला. सुप्रिया सुळे या पवार कुटुंबातील असल्याने त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे असून ते चुकीचे म्हणता येणार नाही; जर विलीनीकरणाच्या विषयावर आता सर्वजण 'फुलस्टॉप' म्हणत असतील, तर ते चांगलेच आहे, दिल्लीतील प्रत्येक भेटीचा संबंध विलीनीकरणाशी जोडणे योग्य नाही, असे शिरसाट म्हणाले. मात्र, संजय राऊत यांनी या चर्चेला 'दंतकथा' म्हटल्याबद्दल टोमणा मारताना ते म्हणाले की, "राऊतांनी एखाद्या गोष्टीला दंतकथा म्हटले, म्हणजे निश्चितच काहीतरी घडणार आणि नेमके त्यांच्या बोलण्याच्या उलटेच घडणार! राऊतांच्या विधानाप्रमाणेच घडले, तर अनेक मोठे नेते तोंडघशी पडतील."


राज्यातील इतर प्रश्नांवर बोलताना त्यांनी नाना पटोले यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांची चौकशी आणि स्पष्टीकरण केंद्र सरकार करेल असे सांगितले, तर राज्यातील वाघांच्या दहशतीवर वनमंत्री गांभीर्याने उपाययोजना करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील सीएसएमटी परिसरातील वृक्षतोडीबाबत बोलताना, विकासकामांमुळे जुनी झाडे तोडावी लागणे दुःखद असले तरी त्याबदल्यात दुप्पट-तिप्पट झाडे लावली गेल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, अमरावतीमधील अधिकाऱ्यांच्या वादावर आणि पार्टीच्या व्हायरल प्रकारावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "राजकारण्यांच्या ताटात साधे काजू दिसले तरी मोठ्या बातम्या होतात, त्यामुळे अधिकाऱ्यांनी असे नाटक न करता आपल्या पदाचे आणि जबाबदारीचे गांभीर्य राखले पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला. पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या रिंगरोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट दिली. शहरात वाढणारी वाहतूक आणि वर्दळ पाहता रिंगरोडची अत्यंत गरज असून, गेल्या सहा महिन्यांपासून यावर काम सुरू होते आणि आता त्यासाठी ठोस 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. गंगापूर फाट्यापासून डीएमआयसीला (DMIC) लागून जाणारा हा प्रस्तावित रिंगरोड शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Miranda Warning Movie: सस्पेन्स, संशय आणि हत्येचं रहस्य! ‘मिरांडा वॉर्निंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर हा चित्रपटप्रकार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. मात्र एखाद्या गुन्ह्याची

Ramayana box office collection : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या ९ दिवसांत गाठला १,१११ कोटींचा टप्पा!

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) साई पल्लवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! CSMT नंतर आता ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर 'डीमार्ट'तर्फे अत्याधुनिक आणि झक्कास स्वच्छतागृहे सुरू

मुंबई : प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये 25 दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे शक्तिशाली धक्के; हादरली जमीन, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत

भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी सकाळी अचानक झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे संपूर्ण

6,6,6,6,6,4,4,4,4,4,4..! सूर्यकुमार यादवने फक्त 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, मुंबईचा सहज विजय

[caption id="attachment_1075114" align="aligncenter" width="800"] सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमारचा फॉर्म