सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्गकरांसाठी आनंदाची बातमी! १६ नोव्हेंबरपासून चिपी ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार. फ्लाय ९१ कंपनीची ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार असून, पर्यटन आणि रोजगाराला मिळणार नवी भरारी!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


सिंधुदुर्गवासीयांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला. शेती आणि मासेमारीबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे, आर्थिक समृद्धी यावी, हा त्यामागील उद्देश होता. या पर्यटन धोरणाला बळ देण्यासाठी जिल्ह्याला स्वतःचे विमानतळ असावे, यासाठी नारायणराव राणे यांनी पुढाकार घेतला. एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी-वेंगुर्ला येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली. विमानतळ तयार झाल्यानंतर मुंबईसह विविध ठिकाणांहून विमानसेवाही सुरू झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे कालांतराने ही सेवा बंद पडली. त्यानंतरच्या काळात तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांनीही विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विमानतळाच्या विकासाला गती देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विमानतळासमोरील रस्ते, वीजपुरवठा, नाईट लँडिंग यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला. विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) मिळविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळासाठी व्हीजीएफ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आता मोठ्या विमान कंपन्यांनाही या विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.





याच प्रयत्नांचे पहिले पाऊल म्हणून १६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१ कंपनीची सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे प्रकल्प आणण्यात आले असून, वेंगुर्ला वेळाघर तसेच देवगड येथे प्रस्तावित ताज हॉटेल प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, पर्यटकांना जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी विमानतळ हे महत्त्वाचे साधन आहे. ताज सारखे हॉटेल्स व विमानसेवा सुरू होणे ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरणार आहे.


विमानतळ सुरू होणे म्हणजे केवळ विमानसेवा सुरू होणे नव्हे, तर पर्यटनाच्या माध्यमातून टूर गाईडपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आर्थिक सक्षम होण्याची संधी उपलब्ध होणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटन व्यवसायाच्या संधी ओळखून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले. १६ नोव्हेंबरला केवळ विमानाचे टेकऑफ होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने नवी भरारी मिळणार आहे. चला, आपण सर्वांनी मिळून रोजगाराच्या नव्या संधींसाठी होऊया आणि विकसित सिंधुदुर्ग घडविण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

अहिल्यानगरमध्ये दीपावलीच्या रात्री 21 ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळल्या दुर्घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणानिमित्त अहिल्यानगर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच,