Nashik : दिवाळीनंतर नाशिकमध्ये कचऱ्याचा डोंगर ! 15 दिवसांत तब्बल 13 हजार 538 टन कचरा जमा

नाशिक : दिवाळी सणाच्या काळात बाजारपेठांमधील वाढलेली खरेदी-विक्री, व्यावसायिक उलाढाल आणि घराघरांत झालेल्या साफसफाईमुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या घनकचरा संकलनाच्या आकडेवारीनुसार, अवघ्या १५ दिवसांत शहरातून तब्बल १३ हजार ५३८ टन कचरा जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ४ नोव्हेंबर रोजी एका दिवसात सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित झाला. दरम्यान, दिवाळीनंतर शहरातील अनेक निवासी भागांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.



१५ दिवसांत १३ हजार टनांहून अधिक कचरा जमा


महापालिकेच्या २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारीनुसार, शहरात एकूण १३ हजार ५३८ टन कचरा संकलित करण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने आणि निवासी भागांतून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.


२८ ऑक्टोबर रोजी ९२३ टन कचरा जमा झाला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला ८९६ टन, ३० ऑक्टोबरला ८९२ टन आणि ३१ ऑक्टोबरला ८८९ टन कचऱ्याची नोंद करण्यात आली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला कचऱ्याच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली. २ नोव्हेंबर रोजी ९६१ टन, तर ४ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित करण्यात आला. ५ नोव्हेंबर रोजीही ९५१ टन कचरा जमा झाला होता.






११ नोव्हेंबरला कचरा संकलनात अचानक घट


दिवाळीनंतरच्या काळात कचरा संकलनाच्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. ८ नोव्हेंबर रोजी ८७३ टन, ९ नोव्हेंबरला ८४२ टन आणि १० नोव्हेंबर रोजी पुन्हा वाढ होऊन ९१७ टन कचरा संकलित करण्यात आला. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी कचरा संकलनाचे प्रमाण अचानक कमी होऊन ७६२ टनांवर आले. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असताना संकलनातील ही घट लक्षवेधी ठरली आहे.

Comments
Add Comment

आसाममधील काझीरंगा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर; 23 जणांची ओळख पटली, देशभरात हळहळ

दिसपूर : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढून 26 वर

Jalgaon Earthquake : जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ! रावेरसह अनेक तालुके हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरसह अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने

बीसीसीआयच्या अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये निवड झालेल्या खेळाडूची राहत्या घरी आत्महत्या; क्रीडाविश्वात एकच खळबळ!

सध्या देशभरात महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढT असताना आणि युवा खेळाडू आपल्या उज्ज्वल भविष्याचे

यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला भीषण आग ! बसमध्ये 40 प्रवाशांची आरडाओरड अन्...; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या प्रवासी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

Nashik Crime : लग्नास नकार दिल्याचा संताप अनावर, तरुणीचं थेट बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केलं अन्...; नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : लग्न करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक

Nashik : नाशिकरोडमध्ये RPF जवानांची सतर्कता ! हातावर गोंदवलेल्या मोबाईल नंबरमुळे 9 वर्षीय रुद्राची कुटुंबीयांशी भेट

नाशिक : रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीत हरवलेल्या 9 वर्षीय चिमुरड्याला रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि चाईल्ड लाईनच्या