Sunday, November 15, 2026

Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात लवकरच नर्सिंग कॉलेज होणार सुरु, महापालिकेच्यावतीने खासगी संस्थेची निवड

बीएससी नर्सिंग कॉलेजचे मुंबईतील हे पहिले कॉलेज ठरणार आहे

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील खुल्या जागेवर सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत अर्थात पीपीपी तत्वावर नवीन नर्सिंग कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. या नर्सिंग कॉलेज करता महापालिकेच्यावतीने संस्थेची निवड करण्यात आली आहे. हे नर्सिंग कॉलेज चालवण्यासाठी वीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन ही संस्था पात्र ठरली असून . ५.५६ कोटी रुपये एवढ्या रक्कमेचे एक वेळचे उच्चत्तम अधिमूल्य आणि प्रति वर्षी २३५० रुपये वार्षिक भाडे तत्वावर ही जागा दहा वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाणार आहे. बीएससी नर्सिंग कॉलेज हे मुंबईमध्ये नसल्याने हे मुंबईतील पहिले नर्सिंग कॉलेज ठरणार आहे.

उपनगराचे पालकमंत्री यांनी ११ सप्टेंबर २०२५ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रे पश्चिम येथील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील खुल्या जागेवर सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याबाबत विनंती केलेली होती. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. महानगरपालिका आयुक्त यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री तसेच मंत्री व पालकमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत (पीपीपीपी) विकसित करण्याचा निर्णय घेतला. तसेच या भूखंडाचे आवश्यक त्या क्षमतेनुसार नर्सिंग कॉलेज व उर्वरित जागेवर विकासक इतर शैक्षणिक प्रयोजनासाठी वापर असे प्रकल्पाचे स्वरूप असावे,अशाप्रकारे निविदा मागविण्याचे ठरविण्यात आले.

या नर्सिंग कॉलेज किमान १०० विद्यार्थी असलेले क्षमतेचे कॉलेज स्थापन करण्यात येत असून खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत ५.५६ कोटी रुपये एवढ्या रक्कमेचे एक वेळचे उच्चत्तम अधिमूल्य अधिक प्रती वर्ष २,३५० रुपये एवढा वार्षिक भाडेपट्टा अशाप्रकारे प्रथमतः १० वर्षाच्या कालावधीकरिता आणि त्यानंतर भाडेपट्टा रक्कमेत प्रत्येक दहा वर्षानंतर १० टक्के वाढ करण्यासोबत वीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन ही संस्था पात्र ठरली असून . ५.५६ कोटी रुपये एवढ्या रक्कमेचे एक वेळचे उच्चत्तम अधिमूल्य आणि प्रति वर्षी २३५० रुपये वार्षिक भाडे तत्वावर ही जागा दहा वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाणार आहे.

वीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन द्वारा संचालित माधुरीबाई देशमुख इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मार्फत बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी १५०, एमएससी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी ३५, पोस्ट बेसिक बेचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी ४० आणि जीएनएम नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मागील २० वर्षाचा अनुभव आहे तसेच युजीसी आणि महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सिस, नाशिक मार्फत मान्यताप्राप्त आहे. या नर्सिंग कॉलेजमुळे शिकावू नर्सिंग स्टाफची उपलब्धता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणार असून महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना तांत्रिक शिक्षणही याठिकाणी पूर्ण करता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >