बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, तो कोणत्याही रोमँटिक किंवा ॲक्शनपटातून नव्हे, तर हॉरर-कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हीरो की हॉररिन' असं या चित्रपटाचं नाव असून, नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या पोस्टरची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे.(HeroKiHorrorine)
लाल साडीतील भयानक रूप पाहून बसेल धडकी
13 नोव्हेंबर रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरमध्ये लाल साडी नेसलेली एक रहस्यमयी स्त्री दिसत आहे. तिचे लांब मोकळे केस, पांढरे चमकणारे डोळे, टोकदार दात आणि पंजासारखे हात पाहून तिचं भयानक रूप लक्ष वेधून घेत आहे. धुरकट आणि अंधाऱ्या वातावरणात दिसणारी ही आकृती चित्रपटात काहीतरी रहस्यमयी घडणार असल्याची झलक देते. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी 'हिरोइन दिल ले जाती है, हॉररिन दिल खा जाती है' अशी मजेशीर पण लक्षवेधी ओळ लिहिली आहे. त्यामुळे चित्रपटात भीतीसोबतच विनोद आणि मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.(HeroKiHorrorine)
Ramayana OTT Rights: 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक विक्रम; OTT आणि टीव्हीवर कधी येणार? चाहत्यांची उत्सुकता
Ramayana OTT Rights: बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे रणबीर ...
यशवर्धन आहुजासोबत नितांशी गोयल झळकणार
या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत 'लापता लेडीज' या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नितांशी गोयल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या नव्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, यशवर्धनची आई सुनीता आहुजा यादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या चित्रपटात यशवर्धनच्या आईचीच भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यातील आई-मुलाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.(YashvardhanAhuja)
साजिद खान यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटाची निर्मिती
'हीरो की हॉररिन' या चित्रपटाचं दिग्दर्शन साजिद खान करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'हे बेबी', 'हाऊसफुल' आणि 'हाऊसफुल २' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात यशवर्धन आणि नितांशी यांच्याशिवाय चंकी पांडे, जेमी लीव्हर, बृजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात गोविंदा विशेष भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित?
शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अमर बुटाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला जाणार आहे. हा चित्रपट 7 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एकूणच, हॉरर, कॉमेडी आणि रोमान्सचा संगम असलेल्या या चित्रपटातून यशवर्धन आहुजा प्रेक्षकांच्या मनावर किती छाप पाडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(BollywoodDebut)