Sunday, November 15, 2026

Sonakshi Sinha Case: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण न्यायालयाने का केले मुक्त?

Bollywood News: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक करण्यात आली. मात्र, अटकेच्या प्रक्रियेत कायदेशीर नियमांचे पालन न झाल्याने मुंबई न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामुळे डीपफेक आणि सायबर गुन्ह्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील एका तरुणाला अटक केली. मात्र, या प्रकरणात मुंबई न्यायालयाने आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.(LegalUpdate)

नेमकं प्रकरण काय?

सोनाक्षी सिन्हा हिचे काही मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर 13 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दिल्लीतील आर्यन दीपक जैन या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतील शाहदरा परिसरातील जगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला अटक करण्यात आली.(MorphedPhotos)

पोलिसांनी मागितली होती तीन दिवसांची कोठडी

आरोपीला अटक केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला मुंबईत आणून न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी त्याच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. सोनाक्षीचे मॉर्फ केलेले फोटो तयार करण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करण्यात आला, याचा शोध घ्यायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान अटकेच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले.

न्यायालयाने आरोपीला दिलासा का दिला?

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी आरोपीला दिल्लीमधून थेट मुंबईत आणले होते. मात्र, दिल्लीहून मुंबईत आणण्यापूर्वी त्याला तेथील जवळच्या दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले नव्हते. तसेच आवश्यक ट्रान्झिट रिमांडची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपीच्या वकिलांनीही अटकेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. अटकेपूर्वी आवश्यक नोटीस देण्यात आली नाही आणि अटकेचे कारणही योग्य प्रकारे सांगण्यात आले नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला आहे.(SonakshiSinha)

BNSS कलम 35 चा मुद्दा चर्चेत

न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील (BNSS) कलम 35 अंतर्गत असलेल्या तरतुदींचाही उल्लेख केला. सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्याची आवश्यकता का आहे, याची कारणे पोलिसांनी नोंदवणे आवश्यक असते. केवळ पुढील तपास करायचा आहे, या कारणावरून कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता एखाद्या व्यक्तीला कोठडीत ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांची तीन दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळून लावत आरोपीच्या सुटकेचे आदेश दिले.(Cyber Crime)

तपास मात्र अद्याप सुरूच!

न्यायालयाने आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले असले, तरी याचा अर्थ त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले किंवा संपुष्टात आले, असा होत नाही. सोनाक्षी सिन्हाच्या तक्रारीनंतर दाखल झालेल्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >