Yash Raj Films: रोमँटिक हिरो आता हॉरर भूमिका साकरणार; वरुण धवनच्या नव्या चित्रपटाची घोषणा

YRF Horror Film: यश राज फिल्म्सने पहिल्यांदाच हॉरर चित्रपट निर्मितीची घोषणा केली आहे. वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय पन्नू करणार असून, 2028 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

बॉलिवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात आता यश राज फिल्म्सनेही एक वेगळे पाऊल उचलले आहे. रोमँटिक आणि ॲक्शनसाठी ओळखली जाणारे यश राज प्रोडक्शन आता थेट हॉरर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाले आहे. या नव्या चित्रपटासाठी अभिनेता वरुण धवनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वरुणचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



YRF चा पहिलाच हॉरर चित्रपट


यश राज फिल्म्सने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत मनोरंजनविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, प्रोडक्शनच्या चित्रपट प्रवासात पहिल्यांदाच हॉरर प्रकारातील चित्रपटाची भर पडणार आहे. आतापर्यंत विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या YRF कडून आता हॉरर चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना नेमका कसा अनुभव मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.(VarunDhawan)







वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका


या चित्रपटात वरुण धवन मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अभिनयातून वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या वरुणसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरू शकतो. यापूर्वी त्याने 'भेडिया' या चित्रपटातून हॉरर-कॉमेडी प्रकारात काम केले होते. आता मात्र YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे त्याची भूमिका नेमकी कशी असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.(YRF)







दिग्दर्शनाची जबाबदारी अभय पन्नूंकडे


या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय पन्नू करणार आहेत. 'रॉकेट बॉईज' या वेब सीरिजमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. या चित्रपटाची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. आदित्य चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पुढे जाणार असून, अक्षय विधानी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.



2028 मध्ये चित्रपटगृहात होणार प्रदर्शित


निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 31 मार्च 2028 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या चित्रपटाचे नाव, कथानक आणि इतर कलाकारांची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वरुण धवनचा हा आगामी चित्रपट नेमकी कोणती भयकथा घेऊन येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(VarunDhawanNewMovie)

Comments
Add Comment

मराठी सिनेमांचा महाकुंभ! 'चित्रपताका 2026' महोत्सवाचे रविवारी होणार उद्धाटन; प्रवेश नोंदणीचे शुल्क दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त

Daryabhavani Movie: कोकणातील ऐतिहासिक पूर्णगड किल्ल्यावर ‘दर्याभवानी’चे शूटिंग; शिवरायांच्या आरमाराची शौर्यगाथा उलगडणार!

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. छत्रपती शिवाजी

Barpeta artisans Ramayana armor : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाशी आसामचे खास कनेक्शन; बार्पेेटाच्या कुशल कारागिरांनी साकारले अभिनेत्यासाठी खास चिलखत!

दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर बहुचर्चित 'रामायण'

Dhvani Bhanushali : गायिका ध्वनी भानुशालीच्या आयुष्यात नवा अध्याय; प्रियकर यशसोबत उरकला साखरपुडा!

गायिका ध्वनी भानुशालीने शुक्रवारी तिचा प्रियकर यश भानूशालीसोबत साखरपुडा (Dhvani Bhanushali Engagement) झाल्याची घोषणा केली. तिने

Miranda Warning Movie: सस्पेन्स, संशय आणि हत्येचं रहस्य! ‘मिरांडा वॉर्निंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर हा चित्रपटप्रकार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. मात्र एखाद्या गुन्ह्याची

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह