WhatsApp चे नवे फीचर! आता फोटो-व्हिडिओशिवाय स्टेटसवर शेअर करता येणार लोकेशन

व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी सतत नवीन फीचर्सवर काम करत असते. याच अनुषंगाने, व्हॉट्सॲप आता एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना कोणताही फोटो किंवा व्हिडिओ न जोडता थेट त्यांच्या स्टेटसवर लोकेशन शेअर करता येणार आहे.

Whats App New Feature: व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी सतत नवीन फीचर्सवर काम करत असते. याच अनुषंगाने, व्हॉट्सॲप आता एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना कोणताही फोटो किंवा व्हिडिओ न जोडता थेट त्यांच्या स्टेटसवर लोकेशन शेअर करता येणार आहे.


आतापर्यंत व्हाट्सएप स्टेटस वर लोकेशन टाकण्यासाठी सर्व प्रथम कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ निवडून त्याच्यावर लोकेशन स्टिकर लावून स्टेटस अपडेट करावे लागत होते. परंतु, या नवीन फीचरने ही प्रक्रिया अधिक सहज शक्य आहे. व्हॉट्सॲप लवकरच स्टेटसमध्ये एक नवीन लोकेशन शेअरिंग फीचर आणू शकते. यामुळे वापरकर्त्यांना फोटो किंवा व्हिडिओ न जोडता थेट त्यांचे लोकेशन शेअर करता येईल. हे फीचर आणखी सुधारण्यासाठी, व्हॉट्सॲप स्टेटस सेक्शनमध्येच लोकेशन शेअर करण्याचा एक स्वतंत्र पर्याय देण्याच्या तयारीत आहे. हे नवीन फीचर सर्वप्रथम अँड्रॉइड ॲपच्या बीटा आवृत्ती 2.26.45.8 मध्ये दिसून येईल त्यानंतर व्हॉट्सॲपची ही आवृत्ती गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. तथापि, हे फीचर अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ते लवकरच सुरु होण्याच्या टप्प्यात आहे आणि बीटा टेस्टर्ससाठी देखील प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.






नव्या फीचरचे वैशिष्टय


या आगामी फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे, लोकेशन केवळ स्टिकर म्हणून दाखवले जाणार नाही. तर स्टेटसमध्ये एक मॅप कार्ड दिसेल. या कार्डमध्ये शेअर केलेले लोकेशन दर्शवणारा नकाशा आणि एक हिरवा पिन उपलब्ध असेल. तसेच लोकेशनचे नाव आणि संपूर्ण पत्ता देखील दिसेल. जेव्हा वापरकर्ते व्हॉट्सॲपला त्यांच्या लोकेशनचा ॲक्सेस देतात, तेव्हा ॲप त्यांचे सध्याचे लोकेशन (current location) आपोआप दाखवू शकते. त्यानंतर वापरकर्त्याला लोकेशन व्हेरिफाय आणि कन्फर्म करावे लागेल. त्यानंतर ते स्टेटसवर शेअर केले जाऊ शकते.


या नव्या फीचरमधील लोकेशन चालू करावा लागेल यासाठी अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयतेबद्दल चिंता वाटू शकते. परंतु, व्हॉट्सॲपच्या म्हणण्यानुसार, गोपनीयतेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. जर एखाद्या वापरकर्त्याला त्यांचे अचूक स्थान शेअर करायचे नसेल, तर ते त्यांच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये अंदाजे स्थानासाठी परवानगी देऊ शकतात. याशिवाय, वापरकर्ते त्यांच्या सध्याच्या स्थानाऐवजी एक स्थान निवडू शकतील आणि ते शेअर करू शकतील.


जेव्हा एखादा व्यक्ती हा स्टेटस पाहिल, तेव्हा त्यांना स्क्रीनच्या वरच्या बाजूला 'स्थान पहा' (location view) हा पर्याय उपलब्ध दिसेल. या पर्यायावर टॅप करून, ते शेअर केलेल्या स्थानाचा तपशील पाहू शकतात. सध्या, व्हॉट्सॲपचे हे आगामी फीचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आले आहे. परंतु, व्हॉट्सॲपने अजूनतरी त्याच्या लॉन्चबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे, कंपनी हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी केव्हा उपलब्ध करते, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nandish Sandhu Second Marriage: 'उतरन' फेम नंदीश संधू दुसऱ्यांदा बोहल्यावर; अभिनेत्री कविता बॅनर्जीशी बांधली लग्नगाठ

Nandish Sandhu Second Marriage: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नंदीश सिंग संधू याने वयाच्या 44 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. टीव्ही

Ramayana OTT Rights: 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक विक्रम; OTT आणि टीव्हीवर कधी येणार? चाहत्यांची उत्सुकता

Ramayana OTT Rights: बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एका चित्रपटाची

IndiGo Emergency Landing: हवेतच विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड; पुणे विमानतळावर इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग

IndiGo Emergency Landing: पुणे विमानतळावर रविवारी पुण्याहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या 192 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा

Rajasthan Railway Track Blast: राजस्थानमध्ये रेल्वे उडवण्याच्या कटातील दोघांना पंजाबमधून अटक

चंदीगड: राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात रेल्वे रुळावर झालेल्या स्फोट प्रकरणात पंजाबमधून दोघांना अटक

सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला आदळून भीषण आग, आगीत कार चालकाचा मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा कार अपघात झाला आहे. रस्ता