Rajasthan Railway Track Blast: राजस्थानमध्ये रेल्वे उडवण्याच्या कटातील दोघांना पंजाबमधून अटक

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात रेल्वे रुळावर झालेल्या स्फोट प्रकरणात पंजाबमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी मोठा खुलासा केला आहे. या दहशतवादी कटामागे पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचे तपासात सांगण्यात आले आहे. राजस्थान दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएस, श्रीगंगानगर पोलीस आणि पंजाब पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत एका पुरुष आणि एका महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली. दोघानांही पंजाबमधील गुरदासपूरमधून अटक केली आहे.

चंदीगड: राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात रेल्वे रुळावर झालेल्या स्फोट प्रकरणात पंजाबमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी मोठा खुलासा केला आहे. या दहशतवादी कटामागे पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचे तपासात सांगण्यात आले आहे. राजस्थान दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएस, श्रीगंगानगर पोलीस आणि पंजाब पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत एका पुरुष आणि एका महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली. दोघानांही पंजाबमधील गुरदासपूरमधून अटक केली आहे.


अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख 21 वर्षीय महाकदीप कौर आणि 22 वर्षीय दविंदर सिंग अशी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा संबंध पाकिस्तानशी असून सदर महिला शेजारील देशात असलेल्या दोन सूत्रधारांच्या संपर्कात होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.


दरम्यान, अटक करण्यात आलेले देविंदर सिंग आणि महकदीप कौर हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पाकिस्तानात बसलेल्या शाह नावाच्या हँडलरच्या सांगण्यावरून त्यांनी रामसिंगपूरजवळील रेल्वे रुळावर आयईडी स्फोटके लावून स्फोट घडवून आणले. दोन्ही आरोपींचा रेल्वे उडवून देण्याचा कट होता. पुढील चौकशीसाठी त्यांना श्रीगंगानगरमध्ये आणण्यात आले आहे. रविवारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.



पोलीस तपासात 81 लाख मोबाईल नंबर तपासले


या स्फोटानंतर पोलिसांनी तपासासाठी तब्बल 81 लाख मोबाईल नंबर आणि इंटरनेट कॉलिंगचा डेटा तपासला. स्फोट झालेल्या काही भागात पंजाबमधील नंबरवरून इंटरनेटद्वारे फोन केले गेले होते. तोच धागा वापरून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात पंजाब पोलीस दलातील शिपाई कुलदीप आणि त्याची बायको नसीब कौर यांची नावे समोर आली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्यांनी एमआर हॉटेलमध्ये राहणाऱ्या देविंदर आणि महकदीपबद्दल माहिती दिली.


दरम्यान, पोलिसांनी महिलेकडून दोन शस्त्रे, 46 काडतुसे आणि 30,000 रुपये जप्त केले असून, इतर तीन जणांनाही ताब्यात घेतले आहे. या व्यक्तींनी आरोपींना राहण्याची सोय, मोटारसायकल आणि गुन्ह्याच्या घटनास्थळी जाण्यासाठी वाहतुकीची सोय पुरवून मदत केल्याचा संशय आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे 9:45 वाजता, राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील रामसिंगपूरजवळ रेल्वे रुळावर हा स्फोट झाला होता. त्यामुळे दोन रेल्वे स्लीपर फुटले, रुळांचे नुकसान झाले आणि सुमारे अडीच फूट खोल खड्डा पडला. स्फोटाच्या सुमारे 75  मिनिटे आधी त्याच रुळावरून अनुपगड-सुरतगड पॅसेंजर ट्रेन गेली होती.

Comments
Add Comment

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी

International Film Festival: 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ब्रिक्स देशांतील 21 चित्रपटांचे सादरीकरण

57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी 2026 मध्ये ब्रिक्स देशांतील चित्रपटांचे विशेष दालन असणार आहे. या

Assembly Elections 2026 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार तारखा

Assembly Elections 2026 : देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा

Raul John Aju: वय 16, स्वतःची AI कंपनी; वडिलांनाही दिली 2 लाखांची नोकरी!

क्रिकेटपासून ते बॉलिवूड आणि अगदी व्यवसायापर्यंत GenZ प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. या पिढीतील तरुण फक्त

हायकोर्टाच्या नावाने फसवणूक! 129 वेबसाइट्स ब्लॉक, पीएमओने मागितले स्पष्टीकरण

पंतप्रधान कार्यालयाने आज (१४ नोव्हेंबर) दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांना बोलावून एका मोठ्या पडताळणी

आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

[caption id="attachment_894861" align="aligncenter" width="1200"] आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी अनेकदा लोकांना तासनतास