
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 20 ते 22 वाहनांचा चुराडा झाला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज 407 (Chainage 407) वर चक्क गुरांचा एक मोठा कळप महामार्गाच्या मधोमध उभा असल्याचे काही वाहनधारकांना दिसून आले. सुदैवाने सतर्क वाहनधारकांनी वेळीच आपली वाहने थांबवून या गुरांच्या कळपाला बाजूला केले, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ...
'एक्सेस कंट्रोल' महामार्ग म्हणून समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) ओळखला जातो. जिथे बाहेरील कोणताही प्राणी किंवा व्यक्ती महामार्गावर येऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी मजबूत सुरक्षा कुंपण घालण्यात आले आहे. या महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास इतकी असते. तब्बल 120 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक जर गुरांचा कळप आला तर वाहनचालकाचे नियंत्रण सुटू शकते आणि यामुळे भीषण साखळी अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चॅनेज 407 वर हा कळप बाजूला करण्यासाठी काही वाहनधारकांनी आपली वाहने महामार्गावर थांबवली होती. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांची धडक बसता-बसता राहिली आणि मोठा अपघात सुदैवाने टळला. (Buldhana News)
दोन दिवसापूर्वी याच महामार्गावर सकाळी एक टँकर पलटी झाला होता. क्रेनच्या मदतीने हा पलटी झालेला टँकर बाजूला काढण्याचे काम सुरू होते. वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळा थांबवली होती. मात्र त्यामुळे घटनास्थळी सुमारे 40 ते 50 वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचवेळी नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक थेट समोर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. त्यामुळे 12-15 भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. (Samruddhi Highway Accident)






