देशात डिजिटल जनगणनेचा नवा अध्याय; 4 राज्यात आजपासून स्वयं-गणनेला सुरुवात, तर 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण!

जनगणना 2027 अंतर्गत 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान स्वयं गणना प्रक्रिया राबवली जात आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाचा तपशील ऑनलाईन नोंदवून एक विषेय आयडी मिळवता येईल.

देशाच्या जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याला 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या चार राज्यांतील हिमक्षेत्र नसलेल्या भागांमध्ये ऑनलाइन 'स्वयं-गणना' प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या राज्यांतील नागरिक 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत आपल्या कुटुंबाचा तपशील ऑनलाइन सादर करू शकतात.लोक घरी बसून आपल्या मोबाईल फोन किंवा संगणकावरून कुटुंब आणि घरासंबंधी माहिती ऑनलाइन भरू शकतील. या चार राज्यांमध्ये ऑनलाइन स्वयं-गणनेची मुदत संपल्यानंतर 1 डिसेंबर 2026 ते 4 जानेवारी 2027 या कालावधीत जनगणना प्रतिनिधी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नोंदणी करतील. त्यानंतर 5 जानेवारी ते 9 जानेवारी 2027 दरम्यान पुनरावलोकन फेरी पार पडेल.

ऑनलाइन स्वयं-गणना कशी करावी?


आता रांगेत उभे राहण्याची किंवा कागदपत्रांची चिंता करण्याची गरज नाही, कारण जनगणना 2027 पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत आहे. विशेष म्हणजे, 16 भारतीय भाषांमध्ये घरबसल्या ऑनलाइन स्वयं-गणना करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नागरिकांनी फक्त se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल क्रमांक आणि प्राथमिक माहिती टाकून लॉग इन करायचे आहे. त्यानंतर कुटुंब आणि सदस्यांच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित 40 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. ही माहिती सबमिट होताच तुम्हाला एक विशेष 'स्वयं-गणना आयडी' मिळेल. जेव्हा जनगणना कर्मचारी तुमच्या घरी येतील, तेव्हा फक्त हा आयडी त्यांना दाखवून तुमची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.





ऑनलाइन स्वयं-गणना केली नाही तर...


काही कारणास्तव तुम्ही ऑनलाइन स्वयं-गणना करू शकला नाहीत, तर काळजी करण्याचे कारण नाही. अशा कुटुंबांची नोंदणी जनगणना कर्मचाऱ्यांच्या नियमित घरोघरी होणाऱ्या सर्वेक्षणाद्वारे पूर्ण केली जाईल. जनगणना कायदा, 1948 नुसार संकलित केलेली प्रत्येक माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते आणि तिचा वापर केवळ देशाच्या विकासाचे नियोजन व सांख्यिकीय अभ्यासासाठीच होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता या राष्ट्रीय उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे आणि घरी येणाऱ्या गणकांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्रात जनगणना कधी होणार?


महाराष्ट्रासह देशातील उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा जानेवारी 2027 मध्ये सुरू होईल. या राज्यांमध्ये 10 ते 24 जानेवारी 2027 दरम्यान नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणनेची सुविधा उपलब्ध असेल. त्यानंतर 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल आणि 1 ते 5 मार्च 2027 दरम्यान पुनरावलोकन फेरी होईल. दरम्यान, मणिपूर वगळता देशातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरनोंदणी आणि गृहगणनेचा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला आहे.
Comments
Add Comment

कानपूर ते दिल्लीचा प्रवास होणार सोपा! केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून 'कानपूर एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार रमेश अवस्थी यांनी आज 'कानपूर एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला.

फेक कंटेंट, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घाला! सोशल मीडिया कंपन्यांना अश्विनी वैष्णव यांचा इशारा

सोशल मीडिया अधिक जबाबदार करण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा तयार करण्यासाठी समाजात सखोल

Tata Motors best selling car : टाटाच्या या छोट्या कारने मार्केट हलवले! १० महिन्यांत ७० हजार ग्राहक झाले फिदा; पहा कोणती आहे ही गाडी ?

आजच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे स्वतःची एक कार असावी. विशेषतः बजेट कमी असेल, तर लहान आणि

Admiral Krishna Swaminathan statement : "युद्धजन्य सागरी क्षेत्रातून भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही खंबीर!"- नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन

नवी दिल्ली : जगभरात सागरी तणाव वाढत असताना, होर्मुझ सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका का

Bharat Scouts and Guides: देवेंद्र फडणवीस यांची 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

भाजपकडून राघव चड्ढांना मोठी जबाबदारी; पंजाब निवडणुकीच्या जाहीरनामा समितीत नियुक्ती

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. २०२७ च्या विधानसभा