UP Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, मथुरेच्या बैठकीत पुढची रणनिती ठरणार
वर्ष 2027 मध्ये पाच राज्यात निवडणुका आहे. यापैकी महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांकडे सर्व देशाचं लक्ष लागून आहे. असं असताना भाजपाने 2027 उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
November 16, 2026 01:02 PM
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, मथुरेच्या बैठकीत पुढची रणनिती ठरणार (Photo: @@myogiadityanath Twitter)
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुढच्या वर्षी अर्थात 2027 च्या फेब्रुवारी मार्चमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. खासकरून उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मथुरेत भाजपा कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत निवडणुकीसाठी एक रोडमॅप तयार केला जाणार आहे. यासाठी 38 ते 40 सदस्यांची एक कोर टीम तयार केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री, पार्टी प्रभारी, सर्व सह-प्रभारी, प्रदेश अध्यक्ष, महामंत्री, सहा महामंत्री, सहा समन्वयक, पाच पूर्व प्रदेश अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री आणि विभागीय अध्यक्ष यांचा समावेश आहे. निवडणूक व्यवस्थापनात सहभागी असलेले एक किंवा दोन सरकारी मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहतील. तर भाजपा अध्यक्ष नितीन नवीन 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील.
भाजपाचे वरिष्ठ नेतेही राहणार उपस्थित
भाजपचे जिल्हा माध्यम प्रभारी श्याम चतुर्वेदी यांनी वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितले की, या बैठकीला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेते नितीन नवीन, राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्य प्रभारी विनोद तावडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, तसेच सहा संघटनात्मक विभागांतील राज्यमंत्री आणि पक्षाचे इतर अधिकारी यांचा समावेश आहे.
Assembly Elections 2026 : देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका ...
भाजपचे जिल्हा माध्यम प्रभारी श्याम चतुर्वेदी यांनी पुढे सांगितलं की, वरिष्ठ नेते निवडणूक-संबंधित मुद्दे आणि तयारीवर चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी मथुरेची निवड करण्याला राजकीय आणि सांस्कृतिक दोन्ही महत्त्व आहे. भगवान कृष्णाशी घनिष्ठ संबंध असलेल्या ब्रज प्रदेशात आपली वैचारिक आणि संघटनात्मक उपस्थिती मजबूत करणे, हे भाजपचे उद्दिष्ट आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण योजनेच्या दुसऱ्या ...
भाजपचे जिल्हा माध्यम प्रभारी श्याम चतुर्वेदी म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी या बैठकीत मोठा रणनीतिक आराखडा तयार केला जाणार आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना बळ देण्यासोबतच शक्ती केंद्रांची कार्यक्षमता वाढवणे यावर भर दिला जाईल. जे संघटनात्मक घटक सध्या निष्क्रिय आहेत, त्यांना पुन्हा प्रवाहात आणून मतदारांशी थेट नाळ जोडण्याचे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याशिवाय, तरुणाई, महिला आणि नवमतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष जनसंपर्क मोहीम राबवण्याबाबतही या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.