मैदानावर पुन्हा 'स्काय' शो! अवघ्या 29 चेंडूंत 82 धावा कुटत मुंबईला मिळवून दिला विजय

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवची बॅट पु्न्हा एकदा तळपली. गुजरातविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक ठोकलं आणि संघाला विजय मिळवून दिला.

1/5 सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाबाहेर आहे आणि संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. असं असताना पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या नशिबाची पारख करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याने आपल्या बॅटने पुन्हा एकदा बोलण्यास सुरूवात केली आहे. (Photo: Instagram)

2/5 सूर्यकुमार यादवने गुजरात विरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 7 षटकार आणि 9 चौकार मारले. सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट 282हून अधिकचा राहिला. त्याच्या एका खेळीमुळे मुंबईने 198 धावांचं लक्ष्य फक्त 15.4 षटकात पूर्ण केलं. (Photo: Instagram)

3/5 गुजरातने दिलेलं लक्ष्य गाठताना मुबई अवघ्या दोन षटकात 2 विकेट गमावल्या होत्या. अंगकृष रघुवंशी 4 आणि मुशीर खान 14 धावा करून बाद झाले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आला आणि तिसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकून टेन्शन रिलीज केलं. (Photo: Instagram)

4/5 सूर्यकुमार यादवने यानंतर आपला झंझावात सुरूच ठेवला आणि अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आक्रमण सुरूच ठेवलं आणि मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. (Photo: Instagram)

5/5 सूर्यकुमार यादवने यापूर्वी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 21 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने या स्पर्धेतील दोन सामन्यात 50 चेंडूत 12 षटकार आणि 15 चौकार मारले आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांना टीम इंडियात त्याला स्थान देण्यासाठी विचार करावा लागणार आहे. (Photo: Instagram)
Comments
Add Comment

न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो; यशस्वी जयस्वालला संधी मिळणार का? इरफान पठाणने दिलं असं उत्तर

भारताने न्यूझीलंडला टी20 मालिकेनंतर वनडेतही मात दिली. भारताने न्यूझीलंडला वनडे मालिकेत 3-1 ने पराभवाची धूळ चारली.

तो सचिन तेंडुलकर बनेल की विनोद कांबळी? 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीबद्दल कपिल देव यांचा मोठा इशारा!

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि अवघ्या 15 वर्षांचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या त्याच्या स्फोटक

जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड; जागतिक क्रिकेटच्या विस्ताराला मिळणार नवी गती

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बोर्डाने जय शाह यांची अध्यक्षपदी दुसऱ्या कार्यकाळासाठी बिनविरोध

"गौतम गंभीरने अगदी बरोबर बोलले!" मालिका जिंकूनही रवी शास्त्रींचा टीम इंडियाला मोठा इशारा; 2027 वर्ल्ड कपसाठी धोक्याची घंटा?

न्यूझीलंड दौऱ्यावरील चौथ्या वनडे सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय क्रिकेट

ENG vs AUS ODI : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेत मालिकेत 1-1 अशी बरोबरी

ॲडलेड : टॉम बँटनचे शानदार शतक आणि गस ॲटकिन्सनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात

U19 Asia Cup 2026 : शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान OUT; गौतम गंभीरची पोस्ट चर्चेत

Gautam Gambhir Viral Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया कप 2026 च्या (U19 Asia Cup 2026) अत्यंत रोमांचक आणि