इरफान पठाण काय म्हणाला?
इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्समधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, 'मी असं सांगत नाही की वरिष्ठ खेळाडूंना काढा. पण तुमच्याकडे एखाद्या खेळाडूला आराम देण्याची वेळ आली, म्हणजे वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीत हा प्रश्न आहे. तेव्हा यशस्वी जयस्वालला संधी दिली पाहीजे. हे यशस्वी जयस्वाल आणि टीम इंडियासाठी चांगलं असेल. वर्ल्डकपमध्ये त्याला राखीव सलामीवीर म्हणून पुरेशा संधी मिळाल्या आहेत की नाही हे पाहू नये. त्याला तिसरा सलामीवीर म्हणून संधी दिली पाहीजे. संधी मिळाल्यास यशस्वी तयार होईल.' यशस्वी जयस्वालने आतापर्यंत भारतासाठी सहा वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने दोन शतकांसह 285 धावा केल्या आहेत. त्याच्या धावांची सरासरी 71.25 इतकी असून स्ट्राईक रेटही जबरदस्त आहे.
तो सचिन तेंडुलकर बनेल की विनोद कांबळी? 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीबद्दल कपिल देव यांचा मोठा इशारा!
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि अवघ्या 15 वर्षांचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चांगलाच चर्चेत आहे. मात्र, ...
इशान किशनला वर खेळण्याची संधी द्या!
इरफान पठाणने यशस्वी जयस्वालच नाही तर इशान किशनला फलंदाजीत बढती देण्याचा सल्ला दिला आहे. इरफान पठाण म्हणाला की, 'इशान किशनने खालच्या फळीत चांगली फलंदाजी केली आहे. पण इशान किशन डावखुरा फलंदाज आहे. त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. डावखुऱ्या-उजव्या फलंदाजांच्या संयोजनात त्याचा वापर करता येईल. खासकरून फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवायला हवं. संघ व्यवस्थापन काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे मला पूर्णपण माहिती आहे. त्यांना मधल्या फळीत एक पर्यायी खेळाडू हवा आहे.' आता इरफान पठाणचा सल्ला संघ व्यवस्थापन विचारात घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.