‘जिजाई’मध्ये किशोर कदम साकारणार दमदार पोलिस इन्स्पेक्टर; रिंकू राजगुरूच्या चित्रपटाची उत्सुकता वाढली!

प्रत्येक वेळी वेगळ्या स्वभावाची, वेगळ्या भावविश्वाची व्यक्तिरेखा निवडत त्यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध केली आहे. ते जेवढे उत्तम अभिनेते आहेत तेवढेच उत्तम कवीदेखील आहेत. त्यांच्या कविता सादर करण्याच्या शैलीत एक खास लय असते आणि तीच लय त्यांच्या संवादफेकीतसुद्धा दिसून येते. यामुळेच किशोर कदम यांच्या या शैलीचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी ‘जिजाई’मधील ही पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका खास पर्वणीच ठरणार आहे.

Jijai Marathi Movie : झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते किशोर कदम एका दमदार पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटातही विविध धाटणीच्या भूमिका साकारताना आपण किशोर कदम यांना पाहिलेलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रत्येक कामात सोडलेली आहे. किशोर कदम यांनी आजवर केवळ मराठीच नाही तर हिंदीतही आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक वेळी वेगळ्या स्वभावाची, वेगळ्या भावविश्वाची व्यक्तिरेखा निवडत त्यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध केली आहे. ते जेवढे उत्तम अभिनेते आहेत तेवढेच उत्तम कवीदेखील आहेत. त्यांच्या कविता सादर करण्याच्या शैलीत एक खास लय असते आणि तीच लय त्यांच्या संवादफेकीतसुद्धा दिसून येते. यामुळेच किशोर कदम यांच्या या शैलीचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी ‘जिजाई’मधील ही पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका खास पर्वणीच ठरणार आहे.



चित्रपटाविषयी किशोर कदम काय म्हणाले?


या भूमिकेविषयी किशोर कदम यांनी सांगितले की, “‘जिजाई’मध्ये मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेकडे केवळ एक पोलिस इन्स्पेक्टर म्हणून पाहाता येणार नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वामागेही काही अनोखे पैलू आणि एक स्वतंत्र भावविश्व दडलेले आहे. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. या भूमिकेच्या निमित्तानेही मला एक वेगळा अनुभव घेता आला. प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा नक्कीच आपलीशी वाटेल.”






दिग्दर्शक तृशांत इंगळे काय म्हणाले?


“या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर सुरुवातीपासूनच किशोर कदम हेच होते. कोणतीही व्यक्तिरेखा ते केवळ साकारत नाहीत, तर आपल्या अभिनयातून तिला एक स्वतंत्र ओळख देतात. ‘जिजाई’मधील त्यांची भूमिका ही अत्यंत वास्तववादी आहे. त्यांच्या सहज अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळी उंची मिळाली आहे. त्यांच्यासारखा कसलेला अभिनेता या भूमिकेसाठी मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”


स्त्रीचा संघर्ष, स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात उभे राहाण्याची तिची ताकद मांडणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत आहे. किशोर कदम यांच्यासह मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसणार आहेत. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्मची निर्मिती असलेला ' जिजाई ' येत्या 20 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Ankush Chaudhari New Movie: अंकुश-कुशलची गोव्याची धमाल! चित्रपट OTT वर दाखल

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपट थिएटरमध्ये

आशिष शेलारही झाले ‘आदि अनंत’चे चाहते! कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

Aadi Anant Marathi Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा आणि नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा पॅनोरमा स्टुडिओज

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने दिली कथकची लेखी परीक्षा; प्राजक्ता माळीच्या भन्नाट कमेंटने वेधलं लक्ष!

Amruta Khanvilkar Viral Video: 'वाजले की बारा' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजपर्यंत आपण तिला

Sharad Kapoor : शरद कपूरच्या मदतीला धावला सोनू सूद; दिली चित्रपटाची ऑफर आणि वैद्यकीय मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरद कपूर याचा चित्रपटसृष्टीला काम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल

Janak Marathi Movie: सायली संजीवचा 'जनक' चित्रपट रखडला! प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण?

Janak Marathi Movie: अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'जनक' हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. हा

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील 'जलसा' या निवासस्थानाबाहेर गोळीबार