Nashik Kumbh Mela 2027: विकासकामांपासून महत्त्वाच्या घोषणांपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर, कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल्स जाणून घ्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत माहितीसाठी प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचा आणि सोशल मिडिया हँडल्सचा आधार घ्या, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे नागरिक, भाविक आणि संबंधित घटकांना आवाहन

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामांना वेग आला आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनापासून पायाभूत सुविधा, भाविकांसाठीच्या सोयीसुविधा आणि प्रशासकीय निर्णयांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि भाविकांनी कुंभमेळ्याशी संबंधित माहिती मिळवताना केवळ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांचाच आधार घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.


सध्या सोशल मीडियावर कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या, संदेश आणि माहिती प्रसारित होत आहे. मात्र, यातील प्रत्येक माहिती अधिकृत असेलच असे नाही. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची अधिकृत माध्यमांतून खातरजमा करणे आवश्यक आहे.



राष्ट्रपतींच्या हस्ते अधिकृत वेबसाइटचे लोकार्पण


सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या नियोजनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान या अधिकृत वेबसाइटचे लोकार्पण करण्यात आले होते. या वेबसाइटवर कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित महत्त्वाची माहिती, विकासकामांची सद्यस्थिती, प्रशासकीय घोषणा आणि विविध उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.


भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले होते. https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित माहिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि अधिकृत घोषणा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, प्राधिकरणाच्या सर्व अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्सही या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना संकेतस्थळावरूनच प्राधिकरणाच्या विविध डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचता येते.


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील पायाभूत सुविधांची कामे, भाविकांसाठीच्या सोयीसुविधा, प्रशासकीय निर्णय, विविध उपक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्राधिकरणाकडून YouTube, Facebook, X आणि Instagram या माध्यमांतून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.



आयुक्त शेखर सिंह यांचे नागरिकांना आवाहन


कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळा हा व्यापक लोकसहभाग आणि अनेक यंत्रणांच्या समन्वयातून पार पडणारा महत्त्वाचा सोहळा आहे. या अनुषंगाने नागरिक आणि भाविकांपर्यंत अचूक व अद्ययावत माहिती पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीसह विविध व्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि सोशल मिडिया हँडल्सला भेट द्यावी. समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतून करूनच ती पुढे प्रसारित करावी."



सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची अधिकृत डिजिटल माध्यमे


संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in


YouTube : @official_ntkma


Facebook : @ntkmaofficial


X (Twitter) :


- @NTKMA_official


- @s_mahakumbh_IND


- @s_mahakumbh_MH


- @s_mahakumbh-glb


Instagram :


- @ntkma_official


- @simhastha.mahakumbh.ind


- @simhastha.mahakumbh.mh


- @simhastha.mahakumbh.glb

Comments
Add Comment

केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीची संधी! यूपीएससीमार्फत 'गट अ'च्या 13 पदांसाठी भरती; 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये थेट भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध

‘जिजाई’मध्ये किशोर कदम साकारणार दमदार पोलिस इन्स्पेक्टर; रिंकू राजगुरूच्या चित्रपटाची उत्सुकता वाढली!

Jijai Marathi Movie : झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून

Winter Health: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढतोय? आहारात समावेश करा अळशीच्या लाडूचा, हाडांच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर!

हिवाळा सुरू झाला की अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी आणि शरीरातील आखडलेपणाचा त्रास जाणवू लागतो. विशेषतः ज्यांना

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कावनई तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार ! 24.99 कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात

इगतपुरी : आगामी 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व

मतदारसंघ आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राखीव जागांच्या फेरबदलाचा अधिकार राज्य सरकारकडे

एखादा विशिष्ट मतदारसंघ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी राखीव असावा, असा हक्क कोणत्याही मतदाराला किंवा

Oppo Reno 17 Series : 8000mAh बॅटरी आणि 200MP कॅमेरासह येणार नवा स्मार्टफोन

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! कारण स्मार्टफोन मार्केटमध्ये लवकरच एक