Nashik : रामकुंड परिसरात ऑईल पेंटने नावे लिहिणं भोवलं ! महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

रामकुंड आणि गोदाघाट परिसरात अशा प्रकारे रंग लावणे, नावे लिहिणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त सुशोभित करण्यात आलेल्या रामकुंड परिसराचे छठपूजेच्या निमित्ताने विद्रूपीकरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील दगडी घाटांवर काही भाविकांनी ऑईल पेंटच्या साहाय्याने स्वतःची नावे लिहिल्याने गोदाप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत नाशिक महापालिकेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दोषींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


नाशिकमध्ये यंदा छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे ६० हजार नागरिकांनी गोदाघाटावर उपस्थित राहून सूर्यदेवाची उपासना केली. रामकुंडापासून टाळकुटेश्वर पुलापर्यंत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सातपूर आणि अंबड परिसरात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक असल्याने या भागातूनही मोठ्या प्रमाणात भाविक छठपूजेसाठी आले होते.


मात्र, यंदाच्या छठपूजेदरम्यान एक वेगळाच प्रकार घडला. पूजेसाठी जागा आरक्षित करण्याच्या उद्देशाने काही जणांनी रामकुंडासह गोदाघाटावरील विविध ठिकाणी ऑईल पेंटने स्वतःची नावे लिहिली. विशेष म्हणजे, ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील दोन्ही बाजूंच्या घाटांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, या प्रकारामुळे नव्याने सुशोभित केलेल्या घाटांचे विद्रूपीकरण झाले.






रामकुंडाचे विद्रूपीकरण, गोदाप्रेमी संतप्त


या घटनेनंतर गोदाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या रामकुंड परिसरात अशा प्रकारे रंग लावून नावे लिहिणे अयोग्य असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. रामकुंड परिसराचे विद्रूपीकरण करणारे नेमके कोण आहेत? गोदाघाटावर ऑईल पेंटने नावे लिहून स्वतःचा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे का? हा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रकार आहे का? असे प्रश्न  उपस्थित केले. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.



महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा


दरम्यान, नागरिकांच्या नाराजीची दखल घेत नाशिक महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गोदावरी नदीचे संभाव्य प्रदूषण आणि घाटांच्या विद्रूपीकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्या संबंधितांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


यापुढे रामकुंड आणि गोदाघाट परिसरात अशा प्रकारे रंग लावणे, नावे लिहिणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. धार्मिक उत्सव साजरे करताना ऐतिहासिक वारसा आणि गोदावरी नदीच्या स्वच्छतेचे भान राखण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Sharad Kapoor : शरद कपूरच्या मदतीला धावला सोनू सूद; दिली चित्रपटाची ऑफर आणि वैद्यकीय मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरद कपूर याचा चित्रपटसृष्टीला काम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल

"गौतम गंभीरने अगदी बरोबर बोलले!" मालिका जिंकूनही रवी शास्त्रींचा टीम इंडियाला मोठा इशारा; 2027 वर्ल्ड कपसाठी धोक्याची घंटा?

न्यूझीलंड दौऱ्यावरील चौथ्या वनडे सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय क्रिकेट

Prince William Kulhad Chai : मुंबईच्या रस्त्यावर अवतरले 'शाही पाहुणे'! सचिन तेंडुलकरसोबत प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी घेतला 'कुल्हड चहा'चा आस्वाद;

चहावाला मनोज म्हणाला, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण!" मुंबई : मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात सोमवारी एक

Pune Crime News : दिवाळीला माहेरी गेली, पण वैनगंगा नदीच्या जंगलात तिचा मृतदेह सापडला; एअरलाईनमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

पुणे: पुणे विमानतळावर खासगी विमान कंपनीच्या तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या 35 वर्षीय

Janak Marathi Movie: सायली संजीवचा 'जनक' चित्रपट रखडला! प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण?

Janak Marathi Movie: अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'जनक' हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. हा

Mumbai Diwali Crackers : मुंबईत फटाके फुटलेच!

सचिन धानजी मुंबईत दिवाळीत फटाके फुटलेच. लोकांनी न्यायालयाचे निर्देशाला न जुमानता फटाके फोडले. नागरिकांच्या