
विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे निघाले आहेत. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या आठवडाभरात मिरज-लातूर आणि सोलापूर-मिरज मार्गावर एकूण ३६ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. भाविकांना पंढरपूरला पोहोचणे सोपे व्हावे, यासाठीच ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मिरज ते लातूर - दिवसाची सेवा
सकाळी मिरजेहून सुटणारी गाडी दुपारी लातूरला पोहोचणार आहे. तर दुपारी लातूरहून सुटणारी गाडी रात्री उशिरा मिरजेला परतणार आहे. ही सेवा १७ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दररोज उपलब्ध असेल. या गाड्या अरग, सलगरे, कवठे महांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव, येडशी अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील. गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान रात्रीची आणखी एक जोडी चालवली जाणार आहे. रात्री १० वाजता मिरजेहून निघालेली गाडी पहाटे लातूरला पोहोचेल. तर सकाळी ६ वाजता लातूरहून निघालेली गाडी दुपारी मिरजेला येईल.
मुंबई(सुहास शेलार): सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा चालविणाऱ्या ‘जस्ट उडो एव्हिएशन प्रा. लि.’ अर्थात ‘फ्लाय 91’ कंपनीला ...
सोलापूर - मिरज मार्गावरही गाड्या
सोलापूरहून सकाळी ७ वाजता निघणारी गाडी दुपारी १२.२० वाजता मिरजेला पोहोचेल. तर दुपारी १ वाजता मिरजेहून सुटणारी गाडी सायंकाळी ७.१० वाजता सोलापूरला पोहोचेल. ही सेवा देखील १७ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दररोज सुरू राहील. मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, कवठे महांकाळ यांसारख्या स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
तिकीट कसे काढायचे?
या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असतील. प्रत्येक गाडीला १६ सामान्य डबे आणि २ गार्डच्या डब्यासह एकूण १८ डबे असतील. भाविकांना यूटीएस प्रणालीतून किंवा रेलवन अॅपवरून तिकीट काढता येणार आहे. यासाठी मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे सामान्य दर लागू होतील. कार्तिकी वारीला दरवर्षी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.





