TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? 'देसी ब्लिंग 2'मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत.सन २०२१ मध्ये बिग बॉस १५ च्या सिझनमध्ये दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

बिग बॉसच्या घरात सुरू झालेलं त्यांचं प्रेम, त्यानंतर अनेक वर्षांचं रिलेशनशिप, लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय आणि आता लग्नाची चर्चा. लवकरच दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे.

तेजस्वी आणि करण यांना चाहत्यांकडून 'तेजरन' म्हणून ओळखले जाते. ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांचा विवाहसोहळा नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

नेटफ्लिक्सच्या 'देसी ब्लिंग' या रिॲलिटी शोमध्ये करणने तेजस्वीला हटके अंदाजात प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.

त्यानंतर आता एका इन्स्टाग्राम पेजने, करण आणि तेजस्वी 'देसी ब्लिंग 2' या शोमध्येच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या दोघंही या शोच्या शूटिंगसाठी दुबईमध्ये गेले आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाबाबत करण, तेजस्वी किंवा नेटफ्लिक्सकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

करण कुंद्रा पेक्षा तेजस्वी प्रकाश नऊ वर्षांनी लहान असून करणचा जन्म 11 ऑक्टोबर 1984 रोजी झाला, तर तेजस्वीचा जन्म 10 जून 1993 रोजी झाला आहे. या दोघांच्या वयात 9 वर्षांचे अंतर असूनही दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते.

आता 'देसी ब्लिंग 2'मध्ये ही जोडी खरोखरच लग्नबंधनात अडकणार का, हे पाहणे आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
Comments
Add Comment

Tiger Shroff comeback : गोळीबाराच्या धक्क्यातून सावरत टायगर श्रॉफचे सोशल मीडियावर दणक्यात पुनरागमन; चाहत्यांना दिले जबरदस्त सरप्राईज!

गेल्या महिनाभरापासून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या दुर्दैवी घटनेमुळे

Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

मुंबई( सुहास शेलार): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, लोककलेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा सुरेख आविष्कार

Teen Tigada Web Series: प्रेम, क्रिकेट आणि संगीताचा अनोखा संगम! ‘तीन तिगाडा’ वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

Teen Tigada Web Series: प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींचा संगम असलेली ‘तीन तिगाडा’ ही सिरीज आपल्या

‘जिजाई’मध्ये किशोर कदम साकारणार दमदार पोलिस इन्स्पेक्टर; रिंकू राजगुरूच्या चित्रपटाची उत्सुकता वाढली!

Jijai Marathi Movie : झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून

Ravi Dubey Ramayana : "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये..."; 'रामायण'मधील लक्ष्मणच्या भूमिकेनंतर अभिनेता रवी दुबे भावुक!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' या भव्य चित्रपटात प्रभू श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण यांची भूमिका

Ankush Chaudhari New Movie: अंकुश-कुशलची गोव्याची धमाल! चित्रपट OTT वर दाखल

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपट थिएटरमध्ये