Teen Tigada Web Series: प्रेम, क्रिकेट आणि संगीताचा अनोखा संगम! ‘तीन तिगाडा’ वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींचा संगम असलेली ‘तीन तिगाडा’ ही सिरीज आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या तरुणांची कथा मांडते. तरुण वयातील प्रेमाला सहसा कोणतीही ठरलेली दिशा नसते आणि आयुष्यही अनेकदा अनपेक्षित वळणं घेत असतं. या प्रवासात आपल्याला त्याच नात्यांमधील चढ-उतारांचाही सामना कसा करावा लागतो, हे पाहायला मिळणार आहे.

Teen Tigada Web Series: प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींचा संगम असलेली ‘तीन तिगाडा’ ही सिरीज आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या तरुणांची कथा मांडते. तरुण वयातील प्रेमाला सहसा कोणतीही ठरलेली दिशा नसते आणि आयुष्यही अनेकदा अनपेक्षित वळणं घेत असतं. या प्रवासात आपल्याला त्याच नात्यांमधील चढ-उतारांचाही सामना कसा करावा लागतो, हे पाहायला मिळणार आहे. संगीत आणि क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा प्रेमात पडण्याचा आनंद, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द आणि या प्रवासात येणाऱ्या अनपेक्षित प्रसंगांचं चित्रण करते.


‘तीन तिगाडा’ ही सिरीज Streetlamp Media Entertainment LLP आणि I Scream Dreams Media Pvt. Ltd. यांच्या निर्मितीतून साकारली असून, 20 नोव्हेंबर रोजी हिंदी Zee 5 वर प्रीमियर होणार आहे. प्रसन्ना बिष्ट, दानेश रझवी, अर्चिका अरोरा, समर्थ मेहता आणि ग्रुशा कपूर यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. या ट्रेलरमधून प्रेक्षकांना मोठी स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांच्या आयुष्याची झलक पाहायला मिळत आहे. संगीत, क्रिकेट आणि प्रेम अशा तीन वेगवेगळ्या विश्वांची ओळख आपल्याला ट्रेलरमधून होते.






तीन तीगाडा कथानक


आयुष्यात काहीही शक्य आहे असं वाटणाऱ्या तरुण वयात प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणं यांचा वेध. अस्मानी या महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटू आणि मानस गायक होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण. हे दोघेही आपापल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या नात्यात एक अनपेक्षित वळण येतं. दोघेही आई-बाबा होणार असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीला एक वेगळीच दिशा मिळते. स्वतःची स्वप्नं, नातं आणि अचानक आलेली जबाबदारी या सगळ्यांमध्ये अडकलेल्या या तरुण जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हा प्रश्न निर्माण होतो. ज्या भविष्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता, त्याला अचानक सामोरं जाताना या दोघांना आपल्या नात्यातील गुंतागुंत समजून घेण्यासोबतच वैयक्तिक स्वप्नांचाही विचार करावा लागतो. संगीत आणि क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही सिरीज स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या तरुणांची, त्यांच्या नात्यांची, अनपेक्षित परिस्थितींची आणि आयुष्याच्या वास्तवाशी जुळवून घेण्याच्या प्रवासाची गोष्ट सांगते. तरुणाईतील प्रेम, हलकेफुलके क्षण आणि भावनिक चढ-उतार यांचा सुंदर मिलाफ साधणारी ‘तीन तिगाडा’ ही सिरीज प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि मोठं होताना घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांची गोष्ट सांगते. ही वेब सीरिज 20 नोव्हेंबर रोजी हिंदी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.



यावेळी बोलताना अभिनेत्री प्रसन्ना बिष्ट म्हणाली, तीन तिगाडा ही सिरीज खास ठरते, कारण तिची कथा खूप खरी आणि प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. आयुष्य आपल्या ठरवलेल्या योजनेनुसार पुढे जात नाही, तेव्हा आपण कोणते निर्णय घेतो, याची ही गोष्ट आहे. माझ्या व्यक्तिरेखेची एक खास गोष्ट म्हणजे तिला आयुष्याकडून काही गोष्टी ठरावीक पद्धतीने हव्या असतात; मात्र हळूहळू आयुष्य जे काही समोर आणतं, त्याचा स्वीकार करायला ती शिकते. मला वाटतं, अनपेक्षित प्रसंग हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो. कधीकधी आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या दिशेने पुन्हा वाटचाल करण्यासाठी फक्त थोड्या धैर्याची गरज असते, असा प्रसन्ना म्हणाली. पुढे बोलताना, आजच्या अनेक तरुणांना ही गोष्ट आपलीशी वाटेल, कारण हे असं वय असतं जेव्हा आपण स्वतःला समजून घेत असतो, निर्णय घेत असतो, त्यातून शिकत असतो आणि अनेक नवीन गोष्टी अनुभवत असतो. रोमान्स, विनोद, धमाल आणि अनेक अनपेक्षित वळणं यांमुळे ‘तीन तिगाडा’ ही सर्वच भावनांचा सुंदर मिलाफ असलेली सिरीज आहे.

Comments
Add Comment

‘जिजाई’मध्ये किशोर कदम साकारणार दमदार पोलिस इन्स्पेक्टर; रिंकू राजगुरूच्या चित्रपटाची उत्सुकता वाढली!

Jijai Marathi Movie : झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून

Ankush Chaudhari New Movie: अंकुश-कुशलची गोव्याची धमाल! चित्रपट OTT वर दाखल

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपट थिएटरमध्ये

आशिष शेलारही झाले ‘आदि अनंत’चे चाहते! कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

Aadi Anant Marathi Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा आणि नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा पॅनोरमा स्टुडिओज

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने दिली कथकची लेखी परीक्षा; प्राजक्ता माळीच्या भन्नाट कमेंटने वेधलं लक्ष!

Amruta Khanvilkar Viral Video: 'वाजले की बारा' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजपर्यंत आपण तिला

Sharad Kapoor : शरद कपूरच्या मदतीला धावला सोनू सूद; दिली चित्रपटाची ऑफर आणि वैद्यकीय मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरद कपूर याचा चित्रपटसृष्टीला काम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल

Janak Marathi Movie: सायली संजीवचा 'जनक' चित्रपट रखडला! प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण?

Janak Marathi Movie: अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'जनक' हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. हा