Pandharpur News : पंढरपूरच्या आंबे गावातील विहीर दुर्घटना; दोन मजुरांचे मृतदेह बाहेर, आणखी दोघांचा शोध सुरू

यापूर्वी सिद्धेश्वर घाडगे यांचा मृतदेह सापडला होता. उर्वरित आबा घोडके आणि तानाजी घोडके या दोन मजुरांचा शोध अद्याप सुरू आहे.

Solapur News: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चार मजूर गाडले गेल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाने आज पहाटे मंगेश मोरे यांचा मृतदेह बाहेर काढला. यापूर्वी सिद्धेश्वर घाडगे यांचा मृतदेह सापडला होता. उर्वरित आबा घोडके आणि तानाजी घोडके या दोन मजुरांचा शोध अद्याप सुरू आहे.






दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू


15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेली बचाव आणि शोधमोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. रात्री उशिरा NDRF च्या पथकाने पहिला मृतदेह बाहेर काढला होता. त्यानंतर आज पहाटे आणखी एका मजुराचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला.


दोन्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मृतदेह सापडलेले सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे हे रांजणी गावातील रहिवासी होते. तर आणवली गावातील आबा घोडके आणि तानाजी घोडके यांचा शोध सुरू आहे.



आंबे गावात नेमकी दुर्घटना कशी घडली?


पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतातील विहिरीचे काम पूर्ण झाले होते. या सुमारे 50 फूट खोल विहिरीचे मोजमाप घेण्याचे काम सुरू असताना अचानक ढिगारा कोसळला. त्यावेळी विहिरीत उतरलेले चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.


घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. सुरुवातीला स्थानिक पातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाकडून ढिगारा हटवून उर्वरित दोन मजुरांचा शोध घेतला जात आहे.



ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांची नावे



  • आबा घोडके – आणवली, ता. पंढरपूर

  • तानाजी घोडके – आणवली, ता. पंढरपूर

  • सिद्धेश्वर घाडगे – रांजणी, ता. पंढरपूर

  • मंगेश मोरे – रांजणी, ता. पंढरपूर


Comments
Add Comment

Farmer ID : फक्त 2 मिनिटांत करा हे काम, नाहीतर खात्यात जमा होणार नाही शेतकरी योजनेचा पैसा

मुंबई : शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता केवळ अर्ज करून चालणार नाही. त्यासाठी ई-केवायसी पूर्ण

Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, दुपारी उन्हाचा चटका कायम; 19 नोव्हेंबरला विदर्भात पावसाची शक्यता

Maharashtra Weather News: महाराष्ट्रात सध्या हवामान

शेतकऱ्यांनो, ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा! सरकारी मदत मिळवण्यासाठी महत्त्वाचे आवाहन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट

राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी

Eknath Shinde : 11 वर्षांपासून बंद असलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कारखाना पुन्हा सुरू होणार; केंद्राकडून 1,500 कोटींची मदत

पुणे : तब्बल 11 वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या कारखान्याला पुन्हा

Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण