Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला

बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 20 ते 22 वाहनांचा चुराडा झाला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज 407 (Chainage 407) वर चक्क गुरांचा एक मोठा कळप महामार्गाच्या मधोमध उभा असल्याचे काही वाहनधारकांना दिसून आले.

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 20 ते 22 वाहनांचा चुराडा झाला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज 407 (Chainage 407) वर चक्क गुरांचा एक मोठा कळप महामार्गाच्या मधोमध उभा असल्याचे काही वाहनधारकांना दिसून आले. सुदैवाने सतर्क वाहनधारकांनी वेळीच आपली वाहने थांबवून या गुरांच्या कळपाला बाजूला केले, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.






'एक्सेस कंट्रोल' महामार्ग म्हणून समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) ओळखला जातो. जिथे बाहेरील कोणताही प्राणी किंवा व्यक्ती महामार्गावर येऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी मजबूत सुरक्षा कुंपण घालण्यात आले आहे. या महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास इतकी असते. तब्बल 120 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक जर गुरांचा कळप आला तर वाहनचालकाचे नियंत्रण सुटू शकते आणि यामुळे भीषण साखळी अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चॅनेज 407 वर हा कळप बाजूला करण्यासाठी काही वाहनधारकांनी आपली वाहने महामार्गावर थांबवली होती. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांची धडक बसता-बसता राहिली आणि मोठा अपघात सुदैवाने टळला. (Buldhana News)


दोन दिवसापूर्वी याच महामार्गावर सकाळी एक टँकर पलटी झाला होता. क्रेनच्या मदतीने हा पलटी झालेला टँकर बाजूला काढण्याचे काम सुरू होते. वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळा थांबवली होती. मात्र त्यामुळे घटनास्थळी सुमारे 40 ते 50 वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचवेळी नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक थेट समोर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. त्यामुळे 12-15 भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. (Samruddhi Highway Accident)

Comments
Add Comment

केंद्र सरकारकडून आदिवासी बांधवांवर योजनांचा पाऊस, 'या' गोष्टींमुळे समाजाचे पालटणार जीवन

मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; गडचिरोलीला विकासाच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

गडचिरोली: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस

Birsa Munda Jayanti 2026: गडचिरोलीतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल! 'पूर्वी परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे उत्सव'

Birsa Munda Jayanti 2026: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस

PM Narendra Modi : बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आदिवासी विकासाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

गडचिरोली :  आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस

Maharashtra drought : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऊस उत्पादकांसाठी प्रति टन 500 ते 700 रुपयांच्या अनुदानाची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण

Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे दोन दिवस वाहतुकीत बदल; 'या' मार्गांवर नो-पार्किंग

पुणे :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत