Soorya Movie Updates: सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाला मोठा धक्का! प्रदर्शन लांबणीवर, 2027 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

सनी देओलच्या 'सूर्या : अंत से आरंभ तक' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. डॉक्टरांच्या चित्रणावरून निर्माण झालेला वाद आणि सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रक्रिया यामुळे निर्मात्यांना प्रदर्शनाचे नियोजन बदलावे लागले आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. अशातच त्याच्या आगामी 'सूर्या : अंत से आरंभ तक' या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या तारखेला होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेन्यात आला आहे.



नेमका काय आहे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद?


'सूर्या : अंत से आरंभ तक' या चित्रपटाच्या टीझरमधील काही दृश्यांमुळे वाद निर्माण झाला होता. विशेषतः वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांच्या चित्रणावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आक्षेप नोंदवला होता. चित्रपटातील काही दृश्यांमुळे डॉक्टरांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली होती. या संदर्भात संघटनेने संबंधित मंत्रालयाकडे तक्रारही केली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची चर्चा मनोरंजन विश्वात सुरू झाली.(Sunny Deol)







सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रक्रिया ठरली अडथळा?


चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यापूर्वी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) आवश्यक प्रमाणपत्र मिळणे गरजेचे असते. 'सूर्या' चित्रपटाच्या बाबतीत ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला गेल्याने आणि प्रमाणपत्राची प्रक्रिया बाकी असल्याने निर्मात्यांसमोर प्रदर्शनाचे नियोजन बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरची आधीची तारीख कायम ठेवणे शक्य झाले नाही.



निर्मात्यांनी मांडली चित्रपटामागची भूमिका


या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. चित्रपटाच्या टीझरमधील काही सेकंदांच्या दृश्यांवरून संपूर्ण कथानकाबाबत मत बनवणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या विरोधात नसून काही व्यक्तींकडून होणारे गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि सामान्य लोकांचे होणारे शोषण यांसारख्या विषयांवर भाष्य करतो, अशी भूमिका निर्मात्यांनी मांडली आहे. चित्रपटाचा मूळ विषय समजून घेण्यासाठी प्रेक्षकांनी संपूर्ण चित्रपट पाहावा, असे आवाहनही निर्मात्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद आणि त्यावर निर्मात्यांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.(Soorya)







2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता


आता हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी जानेवारी 2027 मधील 15 तारीख संभाव्य मानली जात आहे. मात्र, या तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. प्रमाणपत्राची प्रक्रिया आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण झाल्यानंतरच प्रदर्शनाची अंतिम तारीख स्पष्ट होईल.



चित्रपटात सनी देओलसोबत दिसणार ही कलाकार मंडळी


या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेता रवी किशन, अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. पद्मकुमार यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोसेफ' या लोकप्रिय मल्याळम चित्रपटावर आधारित आहे. मूळ चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे त्याचा हिंदी रिमेक कशा पद्धतीने सादर केला जाणार, याबाबतही उत्सुकता आहे. सनी देओलची दमदार अभिनयशैली आणि गंभीर विषयाची मांडणी यामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.(Soorya Postponed)



चाहत्यांची प्रतीक्षा वाढली!


एकीकडे सनी देओलच्या आगामी चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, तर दुसरीकडे 'सूर्या'च्या प्रदर्शनाला झालेल्या विलंबामुळे चाहत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. चित्रपटाचा टीझर, त्यातील विषय आणि कलाकारांची फळी यामुळे या सिनेमाची आधीपासूनच चर्चा सुरू होती. आता प्रदर्शनाची नवीन तारीख कधी जाहीर होणार आणि चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Jijai Movie: ‘जिजाई’चा ट्रेलर पाहून बॉलिवूडही भारावलं; 20 नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

Jijai Movie: झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा

गोल्डी ढिल्लनची अमिताभ बच्चन यांना धमकी; मुंबईत 200 साथीदार सक्रिय असल्याचा दावा!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली

Sourav Joshi Vlogs: सौरभ जोशीची व्हिएतनाम ट्रीप चर्चेत! 2 दिवसांच्या हॉटेलसाठी मोजले लाखो रुपये?

Gen Z च्या आवडत्या स्टार्सपैकी एक म्हणजे सौरभ जोशी. तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. त्याचे व्लॉग्स

Mrudgandha Puraskar 2026: अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांचा होणार सन्मान! ‘मृद्गंध पुरस्कार 2026’साठी मान्यवरांची निवड

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि कला क्षेत्रात आपल्या योगदानाने वेगळी ओळख निर्माण

TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? 'देसी ब्लिंग 2'मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

[caption id="attachment_1075841" align="alignnone" width="800"] टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी

Tiger Shroff comeback : गोळीबाराच्या धक्क्यातून सावरत टायगर श्रॉफचे सोशल मीडियावर दणक्यात पुनरागमन; चाहत्यांना दिले जबरदस्त सरप्राईज!

गेल्या महिनाभरापासून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या दुर्दैवी घटनेमुळे