या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे किशोर कदम ही दमदार भूमिकेत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरने हिंदी कारकरांचेही लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता रितेश देशमुख, कुमुद मिश्रा, के. के. मेनन, निवेदिता भट्टाचार्य, दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, वासन बाला, स्वानंद किरकिरे, मनीष चौधरी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘जिजाई’चा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच संपूर्ण ‘जिजाई’ टीमचे अभिनंदन करत चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये चाकूने हल्ला! दोघांच्या भांडणात निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला चाकू
मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे वाद-भांडणे आणि त्यातून होणारे जीवघेणे हल्ले ...
बॉलिवूडमधील या कलाकारांकडून मिळालेली कौतुकाची थाप ‘जिजाई’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. एका स्त्रीची जिद्द, तिचा आत्मसन्मान आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती अशा प्रभावी कथानकाची झलक आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’चे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले असून, झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच नुपूर गुहा आणि तुषार राऊत सहनिर्माते आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.