BMC : रुग्णालयातील औषधे आणि वैद्यकीय साहित्यांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांसाठी व्हॉट्सअप कार्यालय?

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :


मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक आरोग्य समिति, अध्यक्षांच्या कार्यालयात 'व्हाट्सअप कार्यालय' आणि 'औषध हक्क नियंत्रण कक्ष' सुरू करण्याची मागणी होत आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर स्वतंत्र कक्ष स्थापन करून, रुग्णालयांमधील औषधे व वैद्यकीय साहित्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी तसेच महानगरपालिका रुग्णालयांमधील आरोग्य सेवा व सुविधा अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच, नागरिकांना सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षांशी थेट संपर्क साधण्यासाठी सुलभ व विश्वासार्ह माध्यम उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून, 'व्हाट्सअप कार्यालय' यंत्रणा सुरु करून, या माध्यमातून, नागरिकांच्या तक्रारी प्राप्त करून त्यांचे २४ तासांच्या आत निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देणे.तसेच, महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्यांचा पुरेसा व नियमित पुरवठा होण्यासाठी मध्यवर्ती खरेदी विभागाच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवणे आवश्यक म्हणून ही मागणी केलली आहे.






याबाबत बोलतांना त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये मुंबईकर नागरिकांना विविध आरोग्य सेवा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. तरीही या आरोग्य सेवा व सुविधा पुरविताना रुग्णालयांमध्ये औषधांचा अपुरा पुरवठा, आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध न होणे, वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून नातेवाईकांना मिळणाऱ्या गैरवर्तनासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. तसेच, महानगरपालिका रुग्णालयांना मध्यवर्ती खरेदी विभागामार्फत औषधे व वैद्यकीय साहित्यांचा होणारा अपुरा पुरवठा अथवा काही वेळा विलंब होत असल्यामुळे, रुग्णांना आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध होत नाहीत. परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेरील औषधांच्या दुकानातून जादा दराने औषधे व उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे अशाप्रकारे 'व्हाट्सअप कार्यालय' यंत्रणा सुरु केल्यास नागरिकांच्या तक्रारी प्राप्त करून त्यांचे निराकारण २४ तासांच्या आत करणे शक्य होईल.

Comments
Add Comment

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांच्या 25 बॅट्सचा अनोखा संग्रह; वानखेडे स्टेडियमवर ‘बॅटोग्राफी’ दालनाचे अनावरण

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील खास आठवणी आता चाहत्यांना

सचिनच्या आठवणींचा खजिना वानखेडेत! 26 ऐतिहासिक बॅट्स पाहण्याची संधी; 'बॅटोग्राफी' प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अविस्मरणीय आठवणींचा

Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

मुंबई( सुहास शेलार): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, लोककलेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा सुरेख आविष्कार

Ravi Dubey Ramayana : "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये..."; 'रामायण'मधील लक्ष्मणच्या भूमिकेनंतर अभिनेता रवी दुबे भावुक!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' या भव्य चित्रपटात प्रभू श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण यांची भूमिका

Prince William Kulhad Chai : मुंबईच्या रस्त्यावर अवतरले 'शाही पाहुणे'! सचिन तेंडुलकरसोबत प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी घेतला 'कुल्हड चहा'चा आस्वाद;

चहावाला मनोज म्हणाला, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण!" मुंबई : मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात सोमवारी एक

Mumbai Diwali Crackers : मुंबईत फटाके फुटलेच!

सचिन धानजी मुंबईत दिवाळीत फटाके फुटलेच. लोकांनी न्यायालयाचे निर्देशाला न जुमानता फटाके फोडले. नागरिकांच्या