Nashik : स्वीकृत नगरसेवकपदानंतर आता 18 पदांसाठी राजकीय रस्सीखेच ! नाशिक महापालिकेत नव्या नियुक्त्यांची तयारी

नाशिक : नाशिक महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड निश्चित झाल्यानंतर संधी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची अपेक्षा होती. मात्र, मर्यादित जागांमुळे अनेकांचा हिरमोड झाला. अशा नाराज इच्छुकांना आता स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून महापालिकेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून एकूण १८ प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे.


नाशिक महापालिकेत भाजपचे सहा, शिवसेनेचे दोन, तर उबाठा आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक, अशा एकूण दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली आहे. या निवडीनंतर विविध राजकीय पक्षांतील इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आता विभागीय स्तरावरील प्रतिनिधींच्या नियुक्त्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन प्रतिनिधी नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार शहरातील एकूण १८ जणांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. या प्रतिनिधींचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे. नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेच्या नगरसचिव विभागामार्फत राबविण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरातीनंतर इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत.


अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागीय कार्यालयांच्या स्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. महापालिका प्रशासनाकडून यासाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. विभागीय अधिकारी आणि विभागीय सभेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांमधून बहुमताच्या आधारे प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे.


स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवेळी राजकीय पक्षांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली होती. अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, दहा जागांच्या मर्यादेमुळे अनेकांना प्रतीक्षा करावी लागली. आता स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्यांमुळे या इच्छुकांना विभागीय स्तरावर महापालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आगामी नियुक्त्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Meta Instagram Algorithm Changes : केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर मेटा ॲक्शन मोडमध्ये; इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममध्ये बदल

मेटा प्लॅटफॉर्म्सने वापरकर्त्यांना दाखवल्या जाणाऱ्या लैंगिकदृष्ट्या उत्तेजक आणि हिंसक सामग्रीचे प्रमाण कमी

Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त

Nashik : नाशिक जिल्ह्यात बालविवाहांचे प्रयत्न सुरूच ! बालविवाहाचे 111 प्रकार उघड, तिघांवर गुन्हे दाखल

नाशिक : बालविवाह रोखण्यासाठी शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जात असतानाही नाशिक जिल्ह्यात

Gokul Milk Union : गोकुळचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील यांची सुनेत्रा पवार यांची भेट; शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील आणि संचालक

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, सलामीवीराचा स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेपूर्वी ट्रेड

NCP Maharashtra: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा निर्णय; एक महिन्याचे वेतन देणार!

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी