मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तसेच शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच यामागचा प्रामाणिक भाव आहे असे आमदारांनी या बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांसह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.
Ajit Pawar Tribute: अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली! एकनाथ शिंदे भावूक
पुणे: पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विविध राजकीय व सामाजिक स्तरांतून वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुणे येथे 16 नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य एका पुतळ्याच्या चौकटीत मावणारे नाही, असे सांगितले. तर पुणे आणि बारामतीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, दूरदृष्टी, प्रशासनावरील विलक्षण पकड आणि सर्वसामान्यांप्रती त्यांची असलेली आत्मीयता हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने आणि हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावपूर्ण प्रतिपादन उपमुख्यमंत्री त्यांनी केले.