कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील आणि संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या या भेटीदरम्यान गोकुळच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.
Crime News : वैद्यकीय उपकरणांची थकीत बिले मंजूर करण्यासाठी 7.5 लाखांची लाच मागितली, राज्य कामगार विमा योजनेचा अधिकारी अटकेत
Crime News: वैद्यकीय उपकरण पुरवठा करणाऱ्या कंपनीची थकीत बिले मंजूर करण्यासाठी 7.5 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य कामगार विमा योजनेतील लेखा अधिकारी ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवा
या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील आणि संचालक मंडळाशी संवाद साधला. गोकुळ दूध संघाचा कारभार करताना दूध उत्पादक शेतकरी सभासदांचे हित नेहमी केंद्रस्थानी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
संघाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक आणि काटेकोरपणे चालवण्यावर भर द्यावा. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापनावर भर
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपण्यासोबतच गोकुळची विश्वासार्हता आणि प्रगती कायम राखणे महत्त्वाचे असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी चेअरमन आणि सर्व संचालकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या सदिच्छा भेटीदरम्यान गोकुळच्या नवनिर्वाचित नेतृत्वाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.