Tuesday, November 17, 2026

'कॅप्टन कूल'ची आयपीएलमधून छप्परफाड कमाई! प्रत्येक हंगामात धोनीला किती मानधन मिळाले? जाणून घ्या

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएलच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम रचले. तसेच छप्परफाड कमाईही केली. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

1/6 आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून महेंद्रसिंह खेळत आहे. 19 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने जबरदस्त कमाई केली. त्याने आयपीएलच्या माध्यमातून 200.72 कोटी कमावले. (Photo: ANI) 2/6 आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा भाग होता. या दरम्यान त्याच्या मानधनात चढउतार पाहायाला मिळाले. एका पर्वात तर धोनी 15 कोटी घेतले होते. तर शेवटच्या दोन पर्वात प्रत्येकी 4 कोटी घेतली. (Photo: ANI) 3/6 आयपीएल 2008 या पहिल्या पर्वात महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्सने 6.03 कोटी दिले होते. त्यानंतर पुढच्या पर्वात त्याचं मानधन 7.32 कोटी झालं. त्यानंतर 2011 मध्ये यात आणखी वाढ झाली आणि 8.16 कोटी मिळाले. तर 2012 मध्ये 8.74 कोटी, तर 2013 मध्ये 9.57 कोटी मिळाले. (Photo: ANI) 4/6 आयपीएल 2014 ते 2017 या कालावधीत चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून त्याला प्रत्येक पर्वासाठी 12.5 कोटी मिळाले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघ पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आला आणि त्याच्या मानधनात 20 टक्क्यांनी वाढ झाली. (Photo: ANI) 5/6 आयपीएल 2018 ते आयपीएल 2021 दरम्यान महेंद्रसिंह धोनीला प्रत्येक पर्वासाठी 15 कोटी मिळाले. त्यानंतर त्याच्या मानधनात कपात झाली आणि 2022 ते 2024 या कालावधीत प्रत्येक पर्वासाठी 12 कोटी मिळाले. (Photo: ANI) 6/6 आयपीएल 2025 स्पर्धेत त्याच्या मानधनात 67 टक्क्यांची घट झाली आणि 4 कोटी रुपयात रिटेन केलं गेलं.शेवटच्या दोन पर्वात त्याला प्रत्येकी 4 कोटी मिळाले. महेंद्रसिंह धोनीने आता निवृत्ती घेतली आहे. तसेच आयपीएल 2027 पासून चेन्नई सुपर किंग्सचा धोनी मेंटॉर असणार आहे. (Photo: ANI)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा