
नाशिक : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव. मात्र, याच दिवाळीत नाशिकमध्ये एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडताना साडीवर ठिणगी पडल्याने २७ वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागला. दिव्या ओमकार चव्हाण असे मृत विवाहितेचे नाव आहे. उपचारादरम्यान रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे महात्मानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फटाके फोडताना साडीने घेतला पेट
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी दिव्या चव्हाण या पती आणि कुटुंबीयांसोबत महात्मानगर परिसरातील एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी फटाके फोडत होत्या. यावेळी फटाक्यांची ठिणगी अचानक त्यांच्या साडीवर पडली. काही क्षणांतच साडीने पेट घेतल्याने दिव्या गंभीररीत्या भाजल्या.
नाशिक : नाशिक महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड निश्चित झाल्यानंतर संधी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक पदाधिकारी आणि ...
पतीने तातडीने रुग्णालयात केले दाखल
पत्नी भाजल्याचे लक्षात येताच पती ओमकार चव्हाण यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील जळीत कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, चेहऱ्यापासून पायापर्यंत शरीराच्या विविध भागांवर गंभीर भाजल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्घटनेने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






