
मुंबई : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीत वाढ होत असून पिंपळगाव, दिंडोशी, वाडा आणि विक्रमगड हे चार तालुके दुष्काळग्रस्त यादीत आले आहेत. तर करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज आणि कागलसह 9 तालुक्यांचे ग्राऊंड सर्व्हेक्षण करण्याचे आदेश महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले.
पाणीटंचाई निवारण, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते.(Maharashtra Drought)
बावनकुळे म्हणाले, ग्राउंड सर्व्हेक्षण आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार चार तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबतचा विचार आहे. तसेच इतर 9 तालुक्यांच्या मागणीवर नव्याने सखोल सर्वेक्षण करण्याचे आदेश उपसमितीने दिले असून, पुढील बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता 'वीबी-जी राम जी' योजनेअंतर्गत मका आणि ज्वारीच्या लागवडीला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि मजुरांना मोठा फायदा होणार असून या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
मुंबई: शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. ...
जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजना पूर्ण करून गावे टँकरमुक्त करण्यासाठी 83 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच ज्या गावांचे रेट्रोफिटिंग व 90 टक्के काम पूर्ण झाले आहे, त्यांच्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी 400 कोटी रुपये वितरित केले आहेत. जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून राज्यातील सर्व जलसंधारण आणि जलसंपदेचे तलाव खोलीकरण करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत.(Indian Farmers)
जलसंपदा विभागाकडे मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री आहे. या यंत्रसामुग्रीचा वापर स्थानिक पातळीवरील तलाव आणि नाल्यांच्या खोलीकरण व गाळ काढण्यासाठी वापर केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही यंत्रणा कार्यरत राहणार असून त्यामुळे दुष्काळाची तीव्रता भविष्यात कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. पीकविमा आणि पीकर्जाबाबतही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्यात मुख्यमंत्री दुष्काळ निवारण उपाययोजना राबविण्याबाबत चारा, जनावरे आणि दुष्काळ हटविण्याच्या उपाययोजना याबाबत सादरीकरणही करण्यात आले. पाण्याचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणासाठी सुमारे 5 हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेशही यावेळी बावनकुळे यांनी यावेळी दिले.(Rural Maharashtra)
मुंबई: नक्षलवाद्यांनी यापूर्वी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेली शस्त्रे शोधण्यासाठी माहिती देणाऱ्यांना आता रोख बक्षीस देण्यात येणार आहे. शस्त्रांचा ...
आंदोलनकर्त्याला बैठकीतूनच लावला फोन
राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून तालुके दुष्काळी जाहीर व्हावेत यासाठी काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरु आहे. अशाच प्रकारे गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष वेधल्यानंतर दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीतूनच आंदोलकाला फोन लावला. आपल्या तालुक्याचे ग्राऊंड सर्वेक्षण सुरु असून त्यानंतर तालुका दुष्काळी जाहीर होणार किंवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत आपण आंदोलन न करता ते थांबवावे अशी विनंती केली. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार करु असे आश्वासन आंदोलनकर्त्यांनी दिले.(DroughtHit)




