Tuesday, November 17, 2026

Jijai Movie: ‘जिजाई’चा ट्रेलर पाहून बॉलिवूडही भारावलं; 20 नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे किशोर कदम ही दमदार भूमिकेत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरने हिंदी कारकरांचेही लक्ष वेधून घेतले आहे.

Jijai Movie: झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, कुटुंबासाठी धडपडत प्रत्येक स्त्री रोज घराबाहेर पडते. मात्र, या प्रवासात तिच्या सुरक्षेचं, तिच्या अस्तित्वाचं, स्वाभिमानाचं काय? अन्याय सहन करणं हीच तिची नियती असते की, त्याविरोधात उभं राहाण्याची ताकदही तिच्यात असते? एखादी स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करते, तेव्हा तिच्यातील उग्र रूप कसं समोर येऊ शकतं हे झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. घनदाट जंगल, रात्रीचा गडद अंधार, सुनसान रस्ता, एका बसमधील प्रवास, पोलिसांचा सुरू असलेला तपास आणि रिंकूचे दमदार ॲक्शन सीन्स यामुळे ट्रेलरमध्ये एक वेगळाच थरार निर्माण होतो. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे किशोर कदम ही दमदार भूमिकेत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरने हिंदी कारकरांचेही लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता रितेश देशमुख, कुमुद मिश्रा, के. के. मेनन, निवेदिता भट्टाचार्य, दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, वासन बाला, स्वानंद किरकिरे, मनीष चौधरी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘जिजाई’चा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच संपूर्ण ‘जिजाई’ टीमचे अभिनंदन करत चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
बॉलिवूडमधील या कलाकारांकडून मिळालेली कौतुकाची थाप ‘जिजाई’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. एका स्त्रीची जिद्द, तिचा आत्मसन्मान आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती अशा प्रभावी कथानकाची झलक आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’चे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले असून, झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच नुपूर गुहा आणि तुषार राऊत सहनिर्माते आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >