Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये चाकूने हल्ला! दोघांच्या भांडणात निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला चाकू

अशीच एक धक्कादायक घटना विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे दोन प्रवाशांमधील वादाचा फटका एका भलत्याच निष्पाप प्रवाशाला बसल्याची घटना घडली आहे.

मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे वाद-भांडणे आणि त्यातून होणारे जीवघेणे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे दोन प्रवाशांमधील वादाचा फटका एका भलत्याच निष्पाप प्रवाशाला बसल्याची घटना घडली आहे.


दोन प्रवाशांमधील वादातून फेकलेला चाकूचा निशाणा चुकल्यामुळे तो अन्य एका प्रवाशाच्या छातीत घुसल्याची भयावह घटना रविवारी घडली. या हल्ल्यात प्रवासी जखमी झाला आहे. जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव सुरेश शर्मा हे 53 वर्षांचे असून धारावीत राहणारे रहिवासी आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी शिवा गायकवाड याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपी हा विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, धारावीत राहणारे सुरेश शर्मा हे रविवारी कामानिमित्त बोरिवली येथे गेले होते. तिथून परत येत असताना विरार-चर्चगेट जलद लोकलने ते प्रवास करत होते. मात्र लोकल अंधेरी स्थानकातून पुढे निघाल्यानंतर त्यांच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले दोन प्रवासी आपापसात वाद घालू लागले. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात शिवीगाळ व हाणामारी सुरू झाली. दुपारी 12:12  वाजता लोकल अंधेरी स्थानकात थांबली असता, त्यातील एक प्रवासी फलाटावर उतरला, तर दुसरा प्रवासी डब्यातच उभा राहिला.






ट्रेन अंधेरी स्थानकातून सुरु झाल्यावर फलाटावर उतरलेल्या व्यक्तीने रागाच्या भरात डब्यात उभ्या असलेल्या वाद झालेल्या प्रवाशाच्या दिशेने एक धारदार चाकू फेकला. मात्र, निशाणा चुकल्याने तो जीवघेणा चाकू दरवाजाजवळ उभे असलेल्या 53 वर्षीय सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यात खळबळ उडाली आणि शर्मा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.


डब्यातील प्रवाशांनी तातडीने साखळी ओढली व ट्रेन दुपारी 12:21 वाजता वांद्रे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 वर थांबली. यावेळी रेल्वे सुरक्षा दल (RPF)जवानांनी तपासणी केली असता, सुरेश शर्मा यांच्या छातीतून रक्तस्राव होत असल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक आर. के. शर्मा आणि उपनिरीक्षक अरुण कुमार पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बांद्रा स्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयात जखमी शर्मा यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली आहे.


दरम्यान, चाकू फेकणारा आरोपी शिवा गायकवाड याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील तपासासाठी अंधेरी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Udaipur Viral Video: परदेशी यूट्यूबरकडे चुंबनाची मागणी; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपीची माफी

Udaipur Viral Video: उदयपूरमधून एका थाई-फ्रेंच यूट्यूबरने रात्रीच्या लाईव्हस्ट्रीममध्ये घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर

Bharat Gogawale: दुष्काळग्रस्तांना रोजगाराची हमी! पात्र कुटुंबांना कामापासून वंचित ठेवू नका; मंत्री भारत गोगावले यांचे निर्देश

मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'व्हीबी जी राम जी'अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयके यांचा रोहयो

Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

Bread Poha Recipe: सकाळचा वेळ हा नोकरदार वर्गासाठी धावपळीचा असतो,अशावेळी झटपट पण तितकाच चवदार ऊर्जा टिकवून ठेवणारा नाश्ता

Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

Sanjay Kelkar: भांजेवाडी येथील रहिवाशांचा विरोध असूनही येथील मालक आणि विकासक एसआरए योजना राबवण्यासाठी दबाव टाकत

MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि

TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? 'देसी ब्लिंग 2'मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

[caption id="attachment_1075841" align="alignnone" width="800"] टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी