Ritu Tawde in Bhandup: भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्यांची महापौरांनी घेतली दखल

महापौरांनी प्रशासनाला जुलै 2026 मध्‍ये निर्गमित केलेले परिपत्रक तातडीने रद्द करावे आणि सुधारित परिपत्रक जारी करण्याचे दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्‍या तातडीने मार्गी लावाव्‍यात. स्‍थानिक नागरिकांच्‍या मागणीचा विचार करून वायू प्रदूषण कमी करण्‍यासाठी महानगरपालिका निधीतून पर्यावरणपूरक धुराची उंच चिमणी उभारावी, असे निर्देश मुंबईच्‍या महापौर रितू तावडे यांनी दिले. स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक बाबींकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, असे निर्देश देखील महापौर तावडे यांनी दिले. महापौर रितू तावडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्‍या पुढाकाराने एस आणि टी विभागातील विविध विषयांवरील बैठक सोमवारी १७ नोव्‍हेंबर २०२६ रोजी पार पडली. अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) प्राजक्‍ता वर्मा लवंगारे, उप आयुक्‍त (उद्याने) अजितकुमार आंबी, एस विभागाच्‍या सहायक आयुक्‍त समरीन सय्यद, टी विभागाच्‍या सहायक आयुक्‍त योगिता कोल्‍हे यांच्‍यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.


माजी खासदार मनोज कोटक म्‍हणाले की, भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्मशानभूमीसाठी संबंधित संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मौल्यवान जागा दानस्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा उपयोग नागरिकांच्या सोयीसाठी आणि सार्वजनिक हितासाठी होत आहे. या स्‍मशानभूमीच्‍या विकासासाठी महानगरपालिकेने २ कोटी ७० लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. तथापि, एका परिपत्रकाचा आधार घेऊन २ कोटी ७० लाख रूपयांच्‍या अंदाजपत्रकीय रकमेपैकी संबंधित संस्‍थेने एक तृतीयांश म्‍हणजेच ९० लाख रूपये खर्च करावेत, असे बजावले आहे. हे योग्‍य नाही. संबंधित संस्‍थेने विनामूल्‍य जागा उपलब्‍ध करून दिली असून त्‍याची जाणीव महानगरपालिका प्रशासनाने ठेवावी. कोविड काळात याच स्‍मशानभूमीत दहनविधी मोठ्या संख्‍येने झाले होते, याचीदेखील दखल घ्‍यावी.






महापौर रितू तावडे म्‍हणाल्‍या की, सेवाभावी वृत्‍तीने आणि ना नफा ना तोटा तत्‍त्‍वावर संस्‍था कार्यरत आहे. स्‍थानिक नागरिकांच्या तक्रारींचे दखल घेऊन स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. अंदाजपत्रकीय रकमेपैकी संबंधित संस्‍थांनी एक तृतीयांश रक्‍कम भरावी, याबाबत जुलै २०२६ मध्‍ये निर्गमित केलेले परिपत्रक तातडीने रद्द करावे आणि सुधारित परिपत्रक जारी करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. सामाजिक दायित्‍व निधीतून (सी एस आर निधी ) टी विभागात मुलुंड पश्चिम येथे परमवीर चक्र उद्यान विकसित करण्‍यात आले आहे. त्‍याचे लोकार्पण लवकरात लवकर करावे. उद्यानाच्‍या देखभाल - दुरूस्‍तीसाठी काळजीवाहक संस्‍थेची नेमणूक करावी. त्‍या माध्‍यमातून उद्यानाचे परिरक्षण, सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात करावी, असेदेखील निर्देश महापौर तावडे यांनी दिले.

Comments
Add Comment

मागील 15 वर्षांपासून प्रलंबित कांदिवली पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल 27 बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

MSRTC Record Collection: लालपरीची दिवाळी जोरात! एका दिवसात कमावले 46.53 कोटी रुपये

मुंबई:  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र

Prince William Mumbai : मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केट मिडलटनचा 'बॉस-लेडी' अंदाज, तर प्रिन्स विल्यम्सच्या कॅज्युअल लूकने वेधले लक्ष!

वांद्रे-वरळी सी-लिंकसमोर रिक्षा सफारीचाही घेतला आनंद मुंबई : ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विल्यम्स आणि

Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त

Nitesh Rane vs Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये! मंत्री नितेश राणेंचा इशारा

पवार कुटुंबीयांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी

टॅक्सीचालकांची मनमानी थांबणार! मुंबईतील 6 रेल्वे स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू होणार

लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांकडून होणारी अतिरिक्त भाडे आकारणी रोखण्यासाठी आणि त्यांना