
समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांचे विचार आणि मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रात महसूल विभागनिहाय हो जनसुनावणी घेत आहे. कोकण महसूल विभागांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत नियोजन हॉल, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर (जुने जकात घर, फोर्ट, मुंबई) येथे विशेष जनसुनावणी होणार आहे
ही समिती कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, तेथे येणाऱ्या नागरिकांची सुनावणी थेट समितीसमोर होईल. जे नागरिक नवी मुंबई येथे प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत, त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहावे, तेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची सुनावणी घेतली जाईल.
देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या IIT दिल्ली येथे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) आणि कनिष्ठ अभियंता ...






