Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये दोन भीषण अपघात; बोलेरो आणि बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू, 24 जखमी

मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली पाण्यात कोसळली. दोन्ही ठिकाणी बचाव पथकांकडून मदतकार्य करण्यात आले.

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये दोन दिवसांत झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री रुद्रप्रयाग जिल्ह्यात बोलेरो गाडी खोल दरीत कोसळली. तर मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली पाण्यात कोसळली. दोन्ही ठिकाणी बचाव पथकांकडून मदतकार्य करण्यात आले.



रुद्रप्रयागमध्ये बोलेरो 500 मीटर खोल दरीत कोसळली


सोमवारी रात्री उशिरा रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बांसवाडा-कंधारा महामार्गावर हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी सुमारे 500 मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी गाडीत 10 जण होते. हे सर्वजण लग्नसमारंभातून आपल्या गावी परतत होते.


या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, डीडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली.


अंधार आणि खोल दरीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, पथकांनी स्ट्रेचरच्या मदतीने सर्व 6 जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.





ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर बस पुलाखाली कोसळली


मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ दुसरा अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी बस अनियंत्रित होऊन पुलाखाली सुमारे 100 मीटर खोल पाण्यात कोसळली. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती आहे.


या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचा एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत 18 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



एसडीआरएफ आणि पोलिसांकडून बचावकार्य


अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके घटनास्थळी दाखल झाली. एसडीआरएफ कमांडर अर्पण यदुवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त बचाव पथकेही पाठवण्यात आली. स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफकडून समन्वयाने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही अपघातांमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

चीनला घेरण्यासाठी QUAD ची मोठी रणनीती ! मनीलामध्ये मोदी, ट्रम्प, ताकाइची आणि अल्बनीज यांची महत्त्वपूर्ण बैठक

मनीला : हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान

Notice to Red Bull: रेड बुलवर FSSAI ची कारवाई, 'एनर्जी ड्रिंक' लेबलवरून नोटीस

प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक ब्रँड रेड बुलला (Red Bull) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) नोटीस बजावली आहे. रेड

देशात डिजिटल जनगणनेचा नवा अध्याय; 4 राज्यात आजपासून स्वयं-गणनेला सुरुवात, तर 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण!

देशाच्या जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याला 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात गोवा, उत्तर

कानपूर ते दिल्लीचा प्रवास होणार सोपा! केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून 'कानपूर एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार रमेश अवस्थी यांनी आज 'कानपूर एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला.

फेक कंटेंट, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घाला! सोशल मीडिया कंपन्यांना अश्विनी वैष्णव यांचा इशारा

सोशल मीडिया अधिक जबाबदार करण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा तयार करण्यासाठी समाजात सखोल

Tata Motors best selling car : टाटाच्या या छोट्या कारने मार्केट हलवले! १० महिन्यांत ७० हजार ग्राहक झाले फिदा; पहा कोणती आहे ही गाडी ?

आजच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे स्वतःची एक कार असावी. विशेषतः बजेट कमी असेल, तर लहान आणि