Pune Crime : पुणे जिल्ह्यातील मोक्कातील फरार आरोपी जेरबंद

नगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; तिघे ताब्यात, तिघे फरार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत बाक्या बंड्या काळे (वय ३९, रा. आखोणी, ता. कर्जत), गोट्या बंडू काळे (वय २५, रा. आखोणी, ता. कर्जत) आणि धोंड्या ईश्वर भोसले (वय २८, रा. बेलगाव, ता. कर्जत) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव), रोहित नितीन चव्हाण आणि सुमित नितीन चव्हाण (दोघेही रा. केडगाव, ता. अहिल्यानगर) हे तिघे पसार झाले आहेत.






जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पथक कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना राशीन ते चिलवडी रस्त्यावरील पिराच्या माळावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही जण मोटारसायकलवरून येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकली टाकून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले.


पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तीन मोटारसायकली, तीन मोबाईल, एक कटावणी, एक पान्हा, मिरची पूड, एक कोयता आणि स्क्रू ड्रायव्हर यांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेला धोंड्या ईश्वर भोसले हा पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी असून, या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्यात आलेला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, भीमराव खर्से, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, दीपक जाधव व जालिंदर साखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comments
Add Comment

Nitesh Rane : बंदर प्रकल्पांसोबत स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्या- मंत्री नितेश राणे

मुंबई : वाढवण, दिघी आणि कोकणातील प्रमुख बंदर प्रकल्पांच्या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध

दादर रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच ‘चैत्यभूमी’ होणार! विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या

Manipur News : मणिपूरमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळले; कॅप्टनचा मृत्यू, 3 जवान गंभीर जखमी

मणिपूर : मणिपूरच्या पूर्व इम्फाळ जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळल्याने एका कॅप्टनचा

Maharashtra Pay Rules 2026 : राज्यात यापुढे आठ तासांचा कामाचा दिवस, आठवड्याला 48 तासांची मर्यादा

मुंबई : कामगारांच्या वेतनाचे संरक्षण, कामाचे तास आणि वेतन कपातीसंदर्भात एकसमान कार्यपद्धती निश्चित करणारे

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिटेन केलं की नाही? लखनौ सुपर जायंट्सने स्पष्ट केलं की...

आयपीएल 2027 स्पर्धपूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक

GTA 6 चा काउंटडाउन संपला! न्यूझीलंडमध्ये गेम अनलॉक; भारतात आज मध्यरात्री गेमर्सची प्रतीक्षा संपणार

गेमिंग विश्वात मोठी उत्सुकता! तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर Rockstar Games चा बहुप्रतीक्षित गेम Grand Theft Auto VI (GTA 6) अखेर लॉन्च