गेमिंग विश्वात मोठी उत्सुकता! तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर Rockstar Games चा बहुप्रतीक्षित गेम Grand Theft Auto VI (GTA 6) अखेर लॉन्च होण्याच्या उंबरठ्यावर आहे. न्यूझीलंडमध्ये स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री गेम अनलॉक झाला असून, भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजल्यापासून तेथील गेमर्सना खेळण्याची संधी मिळाली आहे. भारतात मात्र GTA 6 आज, 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता PlayStation 5 आणि Xbox Series X|S वर उपलब्ध होणार आहे. 2013 मध्ये GTA V रिलीज झाल्यानंतर गेमिंग चाहत्यांना Rockstar Games च्या पुढील मोठ्या गेमची प्रतीक्षा होती. आता GTA 6 मुळे ही प्रतीक्षा संपणार आहे. सोशल मीडिया, गेमिंग कम्युनिटी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सध्या GTA 6 चीच चर्चा सुरू आहे. गेमच्या रिलीजपूर्वीच प्री-ऑर्डर आणि कमाईचे मोठे आकडे समोर येत असल्याने गेमिंग विश्वात प्रचंड उत्साह आहे.
Rockstar Games च्या ग्लोबल रोलआउट नियोजनानुसार विविध देशांमध्ये स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री गेम अनलॉक होणार आहे. त्यामुळे टाइम झोननुसार गेमची उपलब्धता वेगवेगळ्या वेळी असेल. भारतीय गेमर्सना 19 नोव्हेंबरच्या रात्री ठीक 12 वाजता GTA 6 खेळता येणार आहे. म्हणजेच मध्यरात्री घड्याळाचे 12 वाजताच गेमर्स Vice City च्या जगात प्रवेश करू शकतील. Sensor Tower च्या अंदाजानुसार, 16 नोव्हेंबरपर्यंत PlayStation 5 आणि Xbox Series X|S वर GTA 6 चे जवळपास 14.94 मिलियन म्हणजे सुमारे 1.5 कोटी प्री-ऑर्डर्स झाल्या आहेत. या प्री-ऑर्डर्समधून अंदाजे 1.45 बिलियन डॉलरची कमाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये PS5 चा वाटा सर्वाधिक असून सुमारे 11.13 मिलियन प्री-ऑर्डर्स PlayStation वर, तर 3.81 मिलियन Xbox वर झाल्याचा अंदाज आहे. मात्र, Rockstar Games किंवा Take-Two Interactive यांनी हे आकडे अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत.
Google Play Best Apps 2026 : व्हिडिओ एडिटिंगपासून गेमिंगपर्यंत! Google ने निवडले 2026 मधील सर्वोत्तम अॅप्स
Google Play Best Apps 2026 : स्मार्टफोनचा वापर आता केवळ कॉलिंग किंवा मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. व्हिडिओ एडिटिंग, आर्ट, AI, फिटनेसपासून ते दैनंदिन ...
भारतीय PlayStation Store वरील उपलब्ध माहितीनुसार GTA 6 च्या Standard Edition ची किंमत 5,999 रुपये, तर Ultimate Edition ची किंमत 7,499 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हा गेम सुरुवातीला केवळ PlayStation 5 आणि Xbox Series X|S वर उपलब्ध होणार आहे. PC गेमर्सना मात्र गेमच्या PC आवृत्तीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. Newzoo च्या अंदाजानुसार, GTA 6 लॉन्चच्या पहिल्या आठवड्यात 37 ते 51 मिलियन कॉपी विकू शकतो. त्यामुळे पहिल्या 7 दिवसांतच 3.25 बिलियन ते 5.2 बिलियन डॉलरपर्यंत व्यवसाय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. GTA 6 च्या लॉन्चमुळे गेमिंग इतिहासातील अनेक विक्रम मोडले जाण्याची शक्यता असून, जगभरातील गेमर्ससाठी आजची मध्यरात्र खास ठरणार आहे.