Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड ! 42 कोटींच्या गैरव्यवहारात न्यायालयाचा बचाव पक्षाला इशारा, 30 नोव्हेंबरला महत्त्वाची सुनावणी

अशोक खरात याच्याविरोधात ईडीने सुमारे तीन हजार पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता परिसरात त्याच्याविरोधात १७ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

नाशिक : भक्तांची आर्थिक फसवणूक आणि तब्बल ४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अशोककुमार एकनाथ ऊर्फ कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) सुरू असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीला आता वेग आला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने बचाव पक्षाकडून आरोप निश्चितीच्या प्रक्रियेत सहकार्य होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून, पुढील सुनावणीसाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.


सोमवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीवेळी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) वतीने विशेष सरकारी वकील अरविंद आघाव, ऋषभ शुक्ला आणि सौरभ पांडेय उपस्थित होते. दुसरीकडे, अशोक खरात, नामकर्ण आवारे, अविनाश कांडेकर, मिलिंद बनकर आणि खरातची पत्नी कल्पना खरात यांच्या वकिलांनी न्यायालयात हजेरी लावली. मात्र, आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी बचाव पक्षाकडून ठोस सहकार्य करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.


यावर विशेष न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने खटल्याची प्रक्रिया विनाकारण लांबवता येणार नाही. प्रकरणाचा जलदगतीने निपटारा होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार दोषनिश्चितीबाबत पुढील आदेशासाठी ३० नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे.



गैरहजर आरोपींना न्यायालयाचा इशारा


या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला नाशिक कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या न्यायालयीन कोठडीत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढ करण्यात आली. दरम्यान, अरविंद बावके आणि मिलिंद बनकर हे संशयित सुनावणीला गैरहजर होते. तसेच काही आरोपींच्या वकिलांनी अनुपस्थितीचे अर्ज सादर केले होते. याची दखल घेत न्यायालयाने संबंधितांना अंतिम संधी दिली आहे. पुढील सुनावणीला सर्व संशयितांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत, अनुपस्थिती कायम राहिल्यास कठोर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला.






काय आहे ४२ कोटींचे फसवणूक प्रकरण ?


अशोक खरात याच्याविरोधात ईडीने सुमारे तीन हजार पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता परिसरात त्याच्याविरोधात १७ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून तसेच चमत्कार घडवून आणण्याचे आमिष दाखवून खरातने अनेक भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.


तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या माध्यमातून सुमारे ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरात यांच्यासह इतर साथीदारांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.ईडीने या प्रकरणात तब्बल ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच स्थावर मालमत्ता आणि विविध आर्थिक गुंतवणुकींच्या माध्यमातून कथितरीत्या संपत्ती जमा केल्याचे तपासात समोर आले आहे.



३० नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष


४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आता आरोप निश्चितीची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. न्यायालयाने बचाव पक्षाला दिलेली अंतिम संधी आणि ३० नोव्हेंबर रोजी होणारी पुढील सुनावणी यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते आणि खटल्याच्या पुढील प्रक्रियेला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Dawood House Demolition: भेंडी बाजारातील दाऊदच्या घरावर महापालिकेची कारवाई; धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार

Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी,

Nashik : इगतपुरीत साई निवाऱ्याचा स्लॅब कोसळला,15 ते 17 साई भक्त गंभीर जखमी

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील 'साई निवारा' या ठिकाणी

BSc Nursing College: बीएससी नर्सिंग कॉलेजच्या समोर उबाठा आडवे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील

मुंबईत तात्पुरत्या अंगणवाड्यांसाठी उद्यान, मैदानांमध्ये कंटेनरची सुविधा? ठरावाच्या सूचनेद्वारे केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक एसआरए तसेच इतर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बालवाडीच्या जागा बाधित होत

Mumbai Food Safety: मुंबईतील हॉटेल्स, रेस्तराँमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवणे बंधनकारक

मुंबई (विशेष प्रतिनिधी): खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी बातमी! 22 डिसेंबरला अंतिम मतदार यादी; निवडणूक आयोगाने जाहीर केले नवे वेळापत्रक

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात (SIR-2026) भारतीय निवडणूक आयोगाने