विश्वासाला तडा! नातवानेच 87 वर्षांच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला लुटले, मित्रासोबत मिळून उडवले तब्बल 29.5 लाख रुपये!

दिल्लीत एका 22 वर्षीय नातवाने आपल्याच 87 वर्षांच्या निवृत्त नौदल अधिकारी आजोबांच्या बँक खात्यातून तब्बल 29.5 लाख रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पैशातून त्याने मित्रासोबत मिळून महागड्या सहली, पार्ट्या आणि कार खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ज्या वयात कुटुंबाची साथ आणि प्रेमाची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात घरच्याच व्यक्तीने विश्वासघात केल्याचा संतापजनक प्रकार नवी दिल्लीतून समोर आला आहे. एका 87 वर्षीय निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या बँक खात्यावर त्यांच्याच 22 वर्षीय नातवाने डल्ला मारत तब्बल 29.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नातवाने आपल्या मित्राच्या मदतीने हे पैसे लांबवले आणि त्यातून मौजमजा, सहली तसेच महागड्या पार्ट्यांवर उधळपट्टी केल्याचे उघडकीस आले आहे.


हा संपूर्ण प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत सुरू होता. वृद्ध अधिकाऱ्याच्या मुलाच्या लक्षात आले की त्यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून वारंवार संशयास्पद रक्कम काढली जात आहे. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पूर्व जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता, तक्रारदाराचा स्वतःचा 22 वर्षांचा मुलगा अभिषेक राघव आणि त्याचा मित्र तुषार चौधरी (वय 22) यांनीच हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.






पूर्व जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त (DCP) राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेकने अत्यंत चलाखीने स्वतःचा मोबाईल नंबर आजोबांच्या बँक खात्याशी जोडला होता. या तांत्रिक प्रवेशाचा गैरवापर करून त्याने तुषारच्या संगनमताने लाखो रुपये परस्पर ट्रान्सफर केले. तपासात असे दिसून आले की, यातील 9.2 लाख रुपये अभिषेकच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खात्यात, तर तब्बल 20.2 लाख रुपये तुषारच्या बँक खात्यात वळवण्यात आले होते.


लुटीच्या या पैशातून दोन्ही तरुणांनी अक्षरशः ऐषोआरामाचे जीवन जगायला सुरुवात केली होती. त्यांनी मनाली, नैनिताल आणि ओडिशा येथे महागड्या सहली केल्या, तसेच नोएडा येथे मित्रांसोबत मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले. इतकेच नव्हे, तर आरोपींनी 2.7 लाख रुपयांची एक जुनी कार खरेदी केली आणि त्या कारमध्ये महागडी म्युझिक सिस्टीम बसवण्यासाठी तब्बल 1.2 लाख रुपये खर्च केले.


पोलिसांनी बँकिंग रेकॉर्ड, केवायसी कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली कार जप्त केली आहे. आरोपी अभिषेक खुर्जा येथून 'बीए एलएलबी' चे शिक्षण घेत आहे, तर त्याचा साथीदार तुषार नर्सिंगचा कोर्स करत आहे. उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी दोघांचीही पोलीस कोठडी मिळवली आहे.

Comments
Add Comment

UP Election 2027 : मोदी-शाह यांच्या दौऱ्यांचे नियोजन; उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारी करत असून रणनीती आखत

सहकाऱ्यांनीच व्यापाऱ्याला बांधून पेटवले? बंगळुरूमधील 2 धक्कादायक घटना

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण बंगळुरू

Uttar Pradesh Election : UP निवडणुकीपूर्वी भाजपचा 'मथुरा प्लॅन' काय आहे ? श्रीकृष्ण जन्मभूमी आणि UCC चा राजकारणावर कसा परिणाम होणार ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच

'लश्करचा शेवटचा स्थानिक दहशतवादी ठार!' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधान; सुरक्षा दलांचे कौतुक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट याला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर

Akvan Cyclone: अकवान चक्रीवादळाचा वेग वाढला; 20 नोव्हेंबरला किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अकवान चक्रीवादळ बुधवारी तीव्र वादळात रूपांतरित झाले असून २० नोव्हेंबर

Bird Flu : भारताला बर्ड फ्लूपासून मोठा दिलासा मिळणार ! देशातील पहिली स्वदेशी H5N1 लस तयार

नवी दिल्ली : देशातील पोल्ट्री व्यावसायिक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली