Wednesday, November 18, 2026

चातुर्मास संपणार, शुभकार्यांना सुरुवात! देवूठनी एकादशीची तारीख आणि पूजा विधी

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी 'देवप्रबोधिनी एकादशी'ची कथा वाचल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. पण यंदा ही एकादशी कधी आहे? तारीख, वेळ आणि कथा जाणून घेऊया.

Devutthani Ekadashi 2026: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी 'देवप्रबोधिनी एकादशी'ची कथा वाचल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. पण यंदा ही एकादशी कधी आहे? तारीख, वेळ आणि कथा जाणून घेऊया.

हिंदू तिथीनुसार, कार्तिक शुक्ल पक्षाची एकादशी 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7:15 वाजता सुरू होईल तर 21  नोव्हेंबर रोजी सकाळी 6:31 वाजता संपेल. देवूठनी एकादशीचे व्रत शुक्रवार, 20  नोव्हेंबर रोजी पाळले जाणार आहे. हे एकादशीचे व्रत शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49  ते 8:56  च्या दरम्यान सोडले जाणार आहे.

देवूठनी एकादशीला चातुर्मासाचा शेवट होतो. चातुर्मास संपल्याने शुभ आणि मंगल कार्यांवरील निर्बंध उठतात. विवाहासाठीचा शुभ काळही या दिवसापासून सुरू होतो. त्यामुळे ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते . देवूठनी एकादशी भीष्म पंचकात येते.

शुभ वेळ

ब्रह्म मुहूर्त: सकाळी 5 वाजून 16 मिनिटांपासून ते सकाळी 6  वाजून 19 मिनिटांपर्यंत.

अभिजित मुहूर्त: सकाळी 11  वाजून 55 मिनिटांपासून ते दुपारी 12  वाजून 37  मिनिटांपर्यंत.

विजय मुहूर्त: दुपारी 2 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजून 41 मिनिटांपर्यंत.

संध्याकाळचा मुहूर्त: सायंकाळी 5 वाजून 27  मिनिटांपासून ते सायंकाळी 6 वाजून 49  मिनिटांपर्यंत.

देवूठनी एकादशीला काय पूजा करावी?

एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर, भगवान विष्णूचे स्मरण करून ध्यान करा. तसेच या दिवशी उपवास व पूजेचा संकल्प करा. आपले घर आणि पूजास्थान या दिवशी पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर, पूजास्थान पवित्र करण्यासाठी त्यावर गंगाजल शिंपडा. चौथऱ्यावर लाल किंवा पांढरे वस्त्र पसरा आणि भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. तसेच, पूजास्थानी एक कलश ठेवा. भगवान विष्णूला गंगाजलाने अभिषेक करा.

यानंतर, तुपाचा दिवा लावा. फळे, फुले, धूप, दिवे आणि नैवेद्य अर्पण करा. देवतेला नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळशीची पाने नक्की समाविष्ट करा. कारण, तुळशीशिवाय भगवान विष्णूला अर्पण केलेला नैवेद्य अपूर्ण असतो असे म्हंटले जाते. त्यानंतर, देवूठनी एकादशीच्या व्रताची कथा ऐका किंवा वाचा आणि भगवान विष्णूची आरती करा. पूजेनंतर आपल्या क्षमतेनुसार गरजू आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा दान द्या. (Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >