
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अनेक दिग्गज आणि युवा खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर जाहीर झालेल्या या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने जोरदार मुसंडी मारली आहे. अर्शदीपने एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत तब्बल 12 स्थानांची झेप घेत संयुक्त 19 वे स्थान पटकावले आहे. एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान पहिल्या स्थानावर कायम आहे. याशिवाय, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने 15 स्थानांची प्रगती करत संयुक्त 12 वे स्थान गाठले आहे, तर त्याचा सहकारी काईल जेमिसननेही 15 स्थानांची झेप घेत 45 वे स्थान मिळवले आहे.
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल मिनी ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटन याने साकारलेल्या शतकी खेळीचा त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. ॲडलेड येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात बँटनने अवघ्या 99 चेंडूंमध्ये 121 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे 2 रे शतक ठरले. या कामगिरीमुळे बँटनने फलंदाजांच्या क्रमवारीत तब्बल 34 स्थानांची मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 13 वे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनेही दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून 2 स्थानांची प्रगती केली आणि 9 व्या स्थानी पोहोचत अव्वल 10 मध्ये पुनरागमन केले आहे. भारतीय स्टार फलंदाज शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत आपले 1 ले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या जोफ्रा आर्चरने 4 स्थानांची झेप घेत 7 वे स्थान गाठून अव्वल 10 गोलंदाजांमध्ये पुनरागमन केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत आहे. या अत्यंत ...
शारजा येथे झिम्बाब्वेने अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकल्यानंतर कसोटी क्रमवारीतही मोठे बदल पाहायला मिळाले. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीने दुसऱ्या कसोटीत 6 बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला आणि गोलंदाजांच्या यादीत 5 स्थानांची झेप घेत संयुक्त 16 वे स्थान मिळवले. फिरकीपटू ग्रॅम क्रेमर 6 स्थानांनी वर चढून 65 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर फलंदाजीत सलामीवीर इनोसेंट काया 50 व्या आणि अनुभवी ब्रेंडन टेलर 62 व्या स्थानावर पोहोचले आहेत. या मालिकेत अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू नासिर मारूफखिल याने आपल्या कसोटी पदार्पणातच इतिहास घडवला. त्याने पहिल्या डावात शानदार शतक ठोकले आणि गोलंदाजीत 7 बळी घेतले. पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात शतक आणि 7 बळी घेणारा तो जगातील केवळ 4 था खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर नासिरने कसोटी फलंदाजी क्रमवारीत 93 वे, तर गोलंदाजांच्या यादीत संयुक्त 78 वे स्थान मिळवले आहे.




