झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील एनटीपीसी प्रकल्पात बांधकाम सुरू असताना कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा अचानक कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील टंडवा येथे असलेल्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या प्रकल्पात बुधवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना घडली आहे. प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेल्या कन्व्हेयर बेल्टचा लोखंडी सांगाडा अचानक तुटून खाली कोसळल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 1 कामगार गंभीर जखमी झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही भयंकर दुर्घटना एनटीपीसी प्रकल्पातील 'सीएचपी जेएच-1' या ठिकाणी घडली. या ठिकाणी कन्व्हेयर बेल्ट उभारणीचे काम वेगाने सुरू होते आणि अनेक कामगार सांगाड्यावर चढून काम करत होते. मात्र, अचानक या सांगाड्याचा मुख्य भाग तुटला आणि संपूर्ण सांगाडा क्षणात खाली कोसळला. सांगाडा कोसळताच त्यावर काम करणारे कामगार खाली पडून ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रकल्प परिसरात एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली.


या अपघाताची माहिती मिळताच प्रकल्प व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली. चतरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिमेष मैथानी यांनी या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच टंडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विपिन कुमार आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.






अपघाताचे दृश्य अत्यंत अंगावर काटा आणणारे होते. एका कामगाराचा मृतदेह तुटलेल्या कन्व्हेयर बेल्टच्या सांगाड्यातच लटकलेल्या अवस्थेत दिसून आला, तर इतर कामगार लोखंडी सांगाड्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. जखमी कामगारांना तातडीने एनटीपीसी परिसरातील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर सांगाड्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटीमुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सखोल तपासानंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.


या कन्व्हेयर बेल्टच्या बांधकामाचे मुख्य कंत्राट 'थायसन' या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर पुढे हे काम 'सिंप्लेक्स' या पेटी कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून केले जात होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, याची चौकशी आता प्रशासनाने सुरू केली असून, वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Comments
Add Comment

विश्वासाला तडा! नातवानेच 87 वर्षांच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला लुटले, मित्रासोबत मिळून उडवले तब्बल 29.5 लाख रुपये!

ज्या वयात कुटुंबाची साथ आणि प्रेमाची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात घरच्याच व्यक्तीने विश्वासघात केल्याचा

UP Election 2027 : मोदी-शाह यांच्या दौऱ्यांचे नियोजन; उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारी करत असून रणनीती आखत

सहकाऱ्यांनीच व्यापाऱ्याला बांधून पेटवले? बंगळुरूमधील 2 धक्कादायक घटना

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण बंगळुरू

Uttar Pradesh Election : UP निवडणुकीपूर्वी भाजपचा 'मथुरा प्लॅन' काय आहे ? श्रीकृष्ण जन्मभूमी आणि UCC चा राजकारणावर कसा परिणाम होणार ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच

'लश्करचा शेवटचा स्थानिक दहशतवादी ठार!' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधान; सुरक्षा दलांचे कौतुक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट याला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर

Akvan Cyclone: अकवान चक्रीवादळाचा वेग वाढला; 20 नोव्हेंबरला किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अकवान चक्रीवादळ बुधवारी तीव्र वादळात रूपांतरित झाले असून २० नोव्हेंबर