Winter Clothes Care Tips : हिवाळ्यात स्वेटर आणि गरम कपड्यांना येतोय कुबट वास ? धुण्याआधी करा हे 3 सोपे उपाय, कपडे राहतील फ्रेश

Winter Clothes Care Tips : हिवाळ्याची चाहूल लागताच कपाटातून स्वेटर, जॅकेट, शाल आणि इतर उबदार कपडे बाहेर काढले जातात. मात्र, अनेक महिने कपाटात बंद ठेवलेल्या या कपड्यांना अनेकदा कुबट वास किंवा ओलसरपणाचा वास येऊ लागतो. अशावेळी अनेकजण कपड्यांवर परफ्यूम मारून हा वास घालवण्याचा प्रयत्न करतात. पण हा कायमस्वरूपी उपाय नाही. कपडे धुण्याआधी काही सोप्या गोष्टी केल्यास दुर्गंधी कमी होण्यास मदत होते आणि कपड्यांचे नुकसानही टाळता येते.



१. कपडे आधी मोकळ्या हवेत ठेवा


कपाटातून स्वेटर, शाल किंवा जॅकेट बाहेर काढल्यानंतर ते लगेच वापरण्याऐवजी काही वेळ मोकळ्या हवेत ठेवा. कपडे हँगरला लटकवा किंवा स्वच्छ जागेवर पसरवून ठेवा. हवामान चांगले असल्यास थोडा वेळ सौम्य उन्हातही ठेवू शकता. यामुळे कपड्यांमधील ओलावा कमी होण्यास आणि कुबट वास दूर होण्यास मदत होते.


मात्र, लोकरीचे आणि गडद रंगाचे कपडे कडक उन्हात जास्त वेळ ठेवू नका. त्यामुळे कपड्यांचा रंग फिका पडण्याची शक्यता असते. ज्या कपड्यांना जास्त दुर्गंधी येत आहे, ते वेगळे ठेवा. तसेच कपडे पुन्हा कपाटात ठेवण्यापूर्वी कपाटातील शेल्फ आणि कोपरे स्वच्छ करून घ्या. कारण तिथे साचलेली धूळ आणि ओलाव्यामुळे कपड्यांना पुन्हा वास येऊ शकतो.






२. धुण्याआधी कपड्यांची योग्य तपासणी करा


सर्व गरम कपडे एकाच वेळी पाण्यात टाकण्याची चूक करू नका. सर्वप्रथम कपड्यांचे प्रकार आणि रंग यानुसार वर्गीकरण करा. स्वेटर, शाल आणि जॅकेटवरील वॉशिंग केअर लेबल काळजीपूर्वक वाचा. कपड्यांच्या खिशात काही वस्तू राहिल्या आहेत का, हे तपासा. त्यावरील धूळ हलक्या हाताने झटकून घ्या. एखाद्या कपड्यावर बुरशीचे डाग दिसत असल्यास तो इतर कपड्यांपासून वेगळा ठेवा. महागडे किंवा नाजूक लोकरीचे कपडे स्वच्छ करताना त्यावरील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.



३. योग्य पद्धतीने धुवा आणि पूर्णपणे वाळवा


लोकरीचे कपडे धुताना सौम्य डिटर्जंट किंवा विशेष वूल वॉशचा वापर करा. खूप गरम पाण्याचा वापर टाळा. तसेच जास्त प्रमाणात साबण किंवा फॅब्रिक सॉफ्टनर वापरल्यास कपड्यांवर त्याचा थर राहू शकतो. धुतल्यानंतर स्वेटर जोरात पिळू नका. त्याऐवजी स्वच्छ टॉवेलवर ठेवून हलक्या हाताने दाबा, जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल. त्यानंतर स्वेटर सपाट जागेवर पसरवून वाळवा. यामुळे त्याचा मूळ आकार टिकून राहण्यास मदत होते. जॅकेट आणि इतर उबदार कपडेही पूर्णपणे वाळल्यानंतरच कपाटात ठेवा. कपाट नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा. त्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या. ओलसर कपडे कधीही बंद कपाटात ठेवू नका.



कपड्यांना पुन्हा कुबट वास येऊ नये म्हणून ही काळजी घ्या


हिवाळ्यातील कपडे वापरण्यापूर्वी त्यांची योग्य स्वच्छता आणि निगा राखणे महत्त्वाचे आहे. कपड्यांना वारंवार कुबट वास येत असल्यास केवळ कपडे स्वच्छ करून उपयोग नाही, तर कपाटात ओलावा निर्माण होण्यामागील कारणही शोधणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास तुमचे स्वेटर, शाल आणि जॅकेट दीर्घकाळ स्वच्छ, सुगंधी आणि वापरण्यायोग्य राहू शकतात.

Comments
Add Comment

Online shopping : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम ! ऑर्डर न करताच घरी येतंय पार्सल, ग्राहकांनी सावध राहण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन

अकोला : ऑनलाइन खरेदीचा वाढता ट्रेंड पाहता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

PM Suraksha Bima Yojana : वर्षाला फक्त 20 रुपयांत 2 लाखांचा अपघात विमा! प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

 PM Suraksha Bima Yojana : देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात अपघात विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र

Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

Bread Poha Recipe: सकाळचा वेळ हा नोकरदार वर्गासाठी धावपळीचा असतो,अशावेळी झटपट पण तितकाच चवदार ऊर्जा टिकवून ठेवणारा नाश्ता

Winter Health: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढतोय? आहारात समावेश करा अळशीच्या लाडूचा, हाडांच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर!

हिवाळा सुरू झाला की अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी आणि शरीरातील आखडलेपणाचा त्रास जाणवू लागतो. विशेषतः ज्यांना

Winter Hair Care : हिवाळ्यात कोंड्याची समस्या वाढली? हे 5 सोपे घरगुती उपाय करून पाहा, काही दिवसांतच दिसेल फरक!

Lifestyle News: हिवाळ्यातील गुलाबी थंडी, उबदार कपडे आणि गरमागरम चहाचा आनंद प्रत्येकालाच आवडतो. मात्र, थंड आणि कोरड्या

Jeff Bezos : तणाव दूर करण्यासाठी जेफ बेझोस यांचा खास मंत्र

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण आणि मानसिक तणाव ही अनेकांसमोरील मोठी समस्या बनली आहे. विशेषतः मोठ्या