Online shopping : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम ! ऑर्डर न करताच घरी येतंय पार्सल, ग्राहकांनी सावध राहण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन

ग्राहकांच्या घरच्या पत्त्यावर बनावट पार्सल पाठवून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांनी कोणतीही ऑर्डर दिलेली नसतानाही त्यांच्या नावाने पार्सल घरी पोहोचवले जात आहे.

अकोला : ऑनलाइन खरेदीचा वाढता ट्रेंड पाहता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. आता ग्राहकांच्या घरच्या पत्त्यावर बनावट पार्सल पाठवून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांनी कोणतीही ऑर्डर दिलेली नसतानाही त्यांच्या नावाने पार्सल घरी पोहोचवले जात आहे. त्यानंतर कुरिअर कर्मचारी ऑनलाइन पेमेंटसाठी दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे.

ऑर्डर न करताच घरी पोहोचले पार्सल


अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात राहणारे नरेश नालट यांच्यासोबत अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या घरी एक पार्सल आले. पार्सल स्वीकारल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरले. मात्र, पार्सल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये असलेली पॅन्ट फाटलेली आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी वस्तू परत करण्यासाठी रिटर्न रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. संबंधित वस्तू त्यांनी ऑनलाइन बुकच केली नव्हती. म्हणजेच, त्यांच्या नावाने आणि पत्त्यावर कोणतीही ऑर्डर नसताना बनावट पार्सल पाठवण्यात आले होते.

सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल


या प्रकारामुळे ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींकडून ग्राहकांच्या घरच्या पत्त्यावर बनावट वस्तू पाठवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची तक्रार अकोला पोलिसांच्या सायबर सेलमध्ये प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर सेलने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः अनोळखी पार्सल स्वीकारताना आणि त्यासाठी ऑनलाइन पेमेंट करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





ऑनलाइन खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा


सायबर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

- नेहमी विश्वासार्ह आणि अधिकृत वेबसाइटवरूनच ऑनलाइन खरेदी करावी.

- अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे.

- नवीन वेबसाइटवरून पहिल्यांदा खरेदी करताना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा.

- पार्सलवरील ऑर्डर आयडी आणि बुकिंग आयडीची खात्री करूनच पार्सल स्वीकारावे.

- ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी पैसे नेमके कोणत्या कंपनीच्या नावाने पाठवले जात आहेत, याची पडताळणी करावी.

- आपण कोणतीही ऑर्डर दिलेली नसताना घरी पार्सल आल्यास ते स्वीकारू नये.

- पार्सल कोणी पाठवले आहे आणि त्याची ऑर्डर नेमकी कोणी केली आहे, याची माहिती घ्यावी.

ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस बदलत आहेत. त्यामुळे केवळ स्वस्त वस्तू किंवा आकर्षक ऑफरच्या मोहात न पडता प्रत्येक व्यवहाराची खात्री करणे गरजेचे आहे. अनोळखी पार्सल स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी केल्यास संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
Comments
Add Comment

Virar Churchgate Local : धावत्या विरार-चर्चगेट लोकलमधील वादातून भिरकावलेला चाकू लागल्याने ५३ वर्षीय प्रवासी जखमी; वांद्रे स्थानकात तरुणाला अटक

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वादातून एका तरुणाने भिरकावलेला चाकू चुकून दुसऱ्याच प्रवाशाला

Nashik : छठपूजेनंतर गोदाघाटाची स्वच्छता, 4.76 टन निर्माल्य संकलित

नाशिक : छठपूजा महोत्सवानंतर गोदावरी नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये चाकूने हल्ला! दोघांच्या भांडणात निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला चाकू

मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे वाद-भांडणे आणि

Mumbai News: अफलातून मिठाईचा तुकडा ठरला जीवघेणा, मुंब्रा येथील तरुणाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

मुंबई : मुंब्र्यात अफलातून मिठाई खाल्ल्यानंतर झुबेर अन्सारी या 35 वर्षीय व्यक्तीचा अनेक अवयव निकामी झाल्याने

Udaipur Viral Video: परदेशी यूट्यूबरकडे चुंबनाची मागणी; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपीची माफी

Udaipur Viral Video: उदयपूरमधून एका थाई-फ्रेंच यूट्यूबरने रात्रीच्या लाईव्हस्ट्रीममध्ये घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर

BMC : आरोग्यांच्या मुद्दयावर शिवसेना आक्रमक, महापौरांकडे केली आरोग्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभेची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील बंद लिफ्टसंदर्भात शिवसेना आक्रमक झाली असून या