Eknath Shinde : दुर्धर आजारांवरील उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आणि सर्वंकष कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुंबई : राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा आर्थिक भार त्यांच्या कुटुंबीयांवर पडू नये, यासाठी अशा आजारांचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आणि सर्वंकष कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


विधानभवनातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात राज्यातील दुर्धर आजारांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वाडिया रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अनीष ऐनापुरे, केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या सह-अध्यापिका डॉ. प्रज्ञा जोशी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






SMA रुग्णांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती


बैठकीत महाराष्ट्रातील SMA रुग्णांची संख्या, आजाराचे निदान, उपलब्ध उपचारपद्धती, औषधांची उपलब्धता आणि रुग्णांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली. या आजाराचे लवकर निदान व्हावे, रुग्णांची नोंदणी व्यवस्थित व्हावी आणि उपचारांची प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र SOP तयार करावी, असे शिंदे यांनी सांगितले.


SMA रुग्णांना तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधांची उपलब्धता सुलभ करण्यावरही त्यांनी भर दिला. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.



वाडिया रुग्णालयाला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याचा प्रस्ताव


महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने मुंबईतील केईएम रुग्णालयाची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून निवड केली आहे. या केंद्रामार्फत दुर्धर आजारांचे निदान, रुग्ण नोंदणी आणि उपचारविषयक कार्यवाही केली जाते.


मुंबईतील वाडिया बालरुग्णालयातही SMA रुग्णांवरील उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयाला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा, असे निर्देश शिंदे यांनी दिले. यासाठी आपण केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



औषधांची उपलब्धता आणि आर्थिक मदतीवर भर


SMA सारख्या दुर्धर आजारांवरील उपचार खर्चिक असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या आजाराचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.


तसेच केईएम रुग्णालयाने या आजारावरील आवश्यक औषधांचा जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश करून त्यांची खरेदी करावी, जेणेकरून ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधे वेळेत उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दुर्धर आजारांचे लवकर निदान, उपचारांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आणि रुग्णांना आर्थिक संरक्षण या सर्व बाबींवर समन्वयाने काम करून ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला दिले.


Comments
Add Comment

Nitesh Rane : बंदर प्रकल्पांसोबत स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्या- मंत्री नितेश राणे

मुंबई : वाढवण, दिघी आणि कोकणातील प्रमुख बंदर प्रकल्पांच्या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध

Maharashtra Pay Rules 2026 : राज्यात यापुढे आठ तासांचा कामाचा दिवस, आठवड्याला 48 तासांची मर्यादा

मुंबई : कामगारांच्या वेतनाचे संरक्षण, कामाचे तास आणि वेतन कपातीसंदर्भात एकसमान कार्यपद्धती निश्चित करणारे

Gondia Railway Station Rescue : गोंदिया रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाचा थरारक बचाव; आरपीएफ महिला कॉन्स्टेबल ठरल्या देवदुत

गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया रेल्वे स्थानकावर एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक घटना घडली आहे, जिथे एका सतर्क

Shivendrasinhraje Bhosle : मराठवाडा-लातूर दुष्काळात मोठा दिलासा; कर्जवसुली न करण्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे बँका, सावकारांना स्पष्ट आदेश!

सातारा : मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात उद्भवलेली भीषण दुष्काळी परिस्थिती आणि एअर इंडिया इमारतीच्या

Chandrashekhar Bawankule : शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदारांसोबत बैठक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रखडलेली मदत मिळवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत

मुंबई :  शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे अद्याप जमा झाले नसल्या