Chandrashekhar Bawankule : शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदारांसोबत बैठक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा लागवड, गोवंश जिवंत ठेवण्यासह जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वापरावा, अशी सूचना महसूलमंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली .


राज्याली सर्व खासदार आणि आमदारांशी महसूलमंत्री बावनकुळे यांनी बुधवारी ऑनलाईन संवाद साधत दुष्काळाशी सामना करण्याबाबत काही उपाययोजनाही सुचविल्या. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 'फार्मर आयडी' तयार करून घेणे आवश्यक आहे. राज्यातील सुमारे ५० लाख शेतकरी अद्याप या लाभापासून वंचित असल्याने त्यांना जाणीवपूर्वक मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, २४ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी आणि पीक पाहणी प्रलंबित आहे, त्यांनी येत्या दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करून घ्यावे. फार्मर आयडी तयार झाल्यावर शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेताना अडचण येणार नाही.



सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर मार्ग आणि अग्रीम मदत


विदर्भातील भूदान आणि सीलिंगच्या जमिनी तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जमीन कसत असूनही नावावर सातबारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढून दीड कोटी शेतकऱ्यांना अग्रीम आणि एनडीआरएफची मदत देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप अग्रीम मदत मिळालेली नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली.






दुष्काळग्रस्त तालुक्यांचे पुन्हा सर्वेक्षण


दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, प्राथमिक स्तरावर ११ तालुक्यांचे ग्राऊंड सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाणार आहे. तसेच ३०४ तालुक्यांची यादी प्राप्त झाली असून, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. "दुष्काळाचा प्रश्न राजकीय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर पात्र तालुक्यांची यादी जाहीर केली जाईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत," असे ते म्हणाले.



राहुल गांधी यांनी भारताच्या बदनामीचा विडा उचलला


काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असल्याचा आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वसुधैव कुटुंबकम' या विचारातून २०४७ चा वेध घेत भारताला जगातील १९२ देशांमध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे ते म्हणाले. राहूल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फरक हा संस्कृती, संस्कार आणि विचारांचा फरक आहे. तसेच, काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी काहीही देणेघेणे नसून, त्यांचा केवळ फायद्यासाठी वापर केला जात आहे.

Comments
Add Comment

Aadhaar Card : आधार कार्डचा वापर कुठे झाला? घरबसल्या तपासा 6 महिन्यांची हिस्ट्री; अनोळखी व्यवहार दिसल्यास 'हे' काम करा!

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

मुंबईत चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास केट मिडलटन यांचा नकार; नेमकं कारण काय?

प्रिन्स विल्यमसोबत केट मिडलटन मुंबईत दाखल झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने

IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता

टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडची घातक चाल; खेळपट्टीवर उतरवणार 3 वेगवान अस्त्रे!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रखडलेली मदत मिळवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत

मुंबई :  शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे अद्याप जमा झाले नसल्या