
मुंबई: जम्मु- काश्मीरमध्ये, सुरक्षा दलाच्या जवानांकडून दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा लष्कर कमांडर लतीफ भटचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. एका मस्जिदमध्ये लतीफ लपलेला होता, अमानुष गोळीबार करत सुरक्षा दलाच्या जवानांनी लतीफ भटचा खात्मा केलेला आहे. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लतीफला सरेंडर होण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या, परंतु त्याने नकार दिला. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. मशिदीतून बाहेर येताच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली.
मुंबई: दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना लष्कर-ए.तैयबाचा ...
लतीफ भटचा कसा खात्मा करण्यात आला याची माहिती कुलगामचे एसएसपी अनायत अली यांनी माध्यमांना मुलाखत देत माहिती दिली. सुरक्षा दलाच्या अधिकार्यांकडून लतीफ भटसोबत व्हिडिओ कॉलवर वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि त्याला सरेंडर करण्यासाठी तयार केले. आत्मसमर्पण केल्यास तुझा जीव वाचेल, अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली. पण तो सरेंडर करण्यासाठी तयारच नव्हता, लतीफने हा प्रस्ताव नाकारला. कारवाईदरम्यान, लतीफ म्हणाला की, "अल्लाहशिवाय माझ्यासोबत कोणीही नाही." एसएसपींच्या म्हणण्यानुसार, लतीफ मध्यरात्री, 02.45 च्या सुमारास मशिदीत घुसला आणि त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. सुरक्षा यंत्रणांनी धार्मिक स्थळाचे नुकसान होऊ नये याची अत्यंत काळजी घेतली आणि मशिदीच्या आत कोणतीही कारवाई केली नाही.
#WATCH | Kulgam, Jammu and Kashmir: On the ongoing encounter, Senior Superintendent of Police (SSP) Kulgam Anayat Ali says, "This encounter is based on a credible input from the Jammu and Kashmir Police. With thorough planning and coordinated efforts alongside all security forces, we properly cordoned off the area today, where a local terrorist named Lateef is trapped in this encounter. We made extensive efforts to appeal to him to surrender and spoke with him. I personally had a video call with him, and I spoke with him for a fairly long time through a phone provided inside. We tried hard to persuade him to surrender, telling him that he is still young and has his whole life ahead of him. He did not agree and entered a mosque and opened fire around 2:45 AM. We are strictly following Standard Operating Procedures (SOPs) and exercising maximum restraint to ensure minimal damage to the mosque. We will neutralise this terrorist in due time; if it takes longer, we have no issue, as we have time and daylight on our side. Security forces have properly cordoned off the area. We hope to take all possible measures into account so that either he comes out on his own, or we handle the situation using our restraint methods to ensure zero or minimal damage to the mosque."
"This will be one of our biggest successes of 2026. He became active on this very day last year (November 18, 2025), joined Lashkar-e-Taiba (LeT), and was heavily self-radicalised. He was receiving instructions from across the border to disrupt peace, tourism, and the economy after carrying out 3–4 ruthless attacks." (Source: SSP Office) — ANI (@ANI) November 18, 2026
एसएसपी म्हणाले की, लतीफ भट 18 नोव्हेंबर 2025 रोजी लश्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला. त्याला जम्मू- काश्मिरमधील, शांतता, पर्यटन आणि अर्थव्यवस्था विस्कळीत करण्यासाठीच्या दहशतवादी संघटनांकडून सुचना मिळत होत्या. त्या प्रकारे तो, काम करत होता. लतीफ भट हा कुलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. 10 नोव्हेंबर 2026 रोजी, हल्ल्याच्या केवळ एक दिवस आधी, लश्करचा कमांडर लतीफ भट आणि दहशतवादी उमर निसार दार यांनी कुलगाम जिल्ह्यातील अनेक संवेदनशील भागांमध्ये रेकी केली होती. त्यांनी मीर बाजार, अखरान, हब्लिश आणि किलम यांसारख्या भागांमध्ये जाऊन रेकी करत सुरक्षा दलांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या ठिकाणांची सविस्तर टेहळणी केली.
Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी, गोदामांचे जाळे आणि व्यापाराची मोठी ...
हा संपूर्ण कट स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. रेकीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी, दोन दहशतवाद्यांनी एका सुनियोजित हल्ल्यात अखरान भागातील सीआरपीएफच्या चौकीवर अचानक हल्ला केला. हल्ला केल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळावरून पळून गेले. तपासाअंती सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा सूत्रधार लतीफ भटची ओळख पटवून त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली.





