Wednesday, November 18, 2026

Dawood House Demolition: भेंडी बाजारातील दाऊदच्या घरावर महापालिकेची कारवाई; धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार

भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये असणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घरावर आणि संबंधित इमारतीवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे.

Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी, गोदामांचे जाळे आणि व्यापाराची मोठी उलाढाल म्हणून भिवंडी शहराला ओळखले जाते. तसेच येथील पाकमोडिया लेन हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे जुने ठिकाण म्हणून ओळखले जाते. दाऊदचे इब्राहिमचे वडीलोपार्जीत घर भिवंडी येथेच आहे. संबंधित मुसाफिरखाना इमारत वर्षानुवर्षे वादात राहिली आहे. या इमारतीची अत्यंत जीर्ण अवस्था झाली आहे. तिच्या भिंती व छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि व्यापारी यांनी या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत.

भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये असणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घरावर आणि संबंधित इमारतीवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे, तसेच या संदर्भात तोडकामाची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाचे आदेश

महापालिकेने सदर इमारतीची पाहणी केल्यानंतर ती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार न्यायालयाने महापालिकेला आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तातडीने महापालिकेने अधिकृत नोटीस काढून इमारत तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, आज करण्यात येणाऱ्या कारवाईत बुलडोझर आणि इतर यंत्रसामग्री वापरली जाणार आहे. आज करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. पोलिस आणि महापालिका कर्मचारी तैनात राहतील.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा कट याच घरात रचला

भेंडी बाजार येथे दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आहे आणि 1986 मध्ये भारतातून पलायन करण्यापूर्वी तो आणि त्याचे कुटुंब याच इमारतीत राहत होते. त्याच इमारतीत दाऊद इब्राहिमचे घर आणि कार्यालय असे दोन्ही होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा जो कट रचण्यात आला होता तो ईथेच करण्यात आला होता.

बीएमसीने ही इमारत 80 वर्षांहून अधिक जुनी असल्यामुळे 18 आणि 19 नोव्हेंबर, 2026 रोजीच इमारत पडण्याच्या तारखा निश्चित केल्या होत्या. तिची अवस्था धोकादायक झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. बीएमसीच्या ‘सी’ वॉर्डने 16 नोव्हेंबर, 2026 रोजी एक नोटीस जारी केली, ही इमारत ‘सी-1’ श्रेणीतील, अत्यंत जीर्ण आणि धोकादायक असल्याचे घोषित केले आणि ती पाडण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या 31 ऑगस्ट, 2020 च्या आदेशानुसार, ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा